आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये दुहेरी आत्महत्या:चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने स्वत:ला पेटवून घेतले, आई आजाराने त्रस्त होती आणि मुलगी तिचे हाल पाहू शकली नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघीही अंधेरीच्या डीएन नगरात होत्या वास्तव्याला

मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथ 55 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीने स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून बुधवारी पोलिसांनी याबाबत अधिकृती माहिती दिली आहे. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचे नाव अस्मिता आणि मुलीचे नाव सृष्टी आहे. हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या अस्मिता या पत्नी आणि सृष्टी ही मुलगी होती. संतोष गुप्ता यांनी 'फरार', 'रोमी: द हीरो' आणि 'आज की औरत' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दोघीही अंधेरीच्या डीएन नगरात होत्या वास्तव्याला
पोलिसांनी सांगितले की, अस्मिता आणि सृष्टी अंधेरी (पश्चिम) मधील डीएन नगरात राहत होत्या. सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले. घरातून आगीचा धूर येत असल्याचे बघून शेजार्‍यांनी अग्निशमन दलाला बोलावले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. दोघींनाही तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. तर 70 टक्के जळालेल्या मुलीने ऐरोली नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

आत्महत्येचे पाऊल का उचलले?

प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, 55 वर्षीय अस्मिता ब-याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यामुळे आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तर आजारी आईचे होणारे हाल बघून मुलीनेही स्वतःचे जीवन संपवले. डी.एन.नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी दोन अॅक्सिडेंटल केसची नोंद करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...