आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे इमेलद्वारे नोंदवला जबाब, म्हणाले - तो खचला होता आणि त्याला सावत्र वागणूक दिली जात होती

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर सुशांतला घेऊन पानी हा मेगा बजेट चित्रपट बनवणार होते.
 • यशराजसोबत शेखर कपूर यांचे मतभेद झाल्यानंतर हा प्रोजेक्ट बंद पडला.
 • या कारणामुळे सुशांत नैराश्येत गेला होता, असे म्हटले जाते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले होते. शेखर कपूर पोलिस स्टेशनमध्ये स्वतः उपस्थित न राहता त्यांनी इमेलच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,  शेखर कपूर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, 'पानी' हा चित्रपट बंद झाल्यामुळे सुशांतला मोठा धक्का बसला होता आणि तो खचून डिप्रेशनमध्ये गेला होता.

शेखर यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट बंद झाल्याचे कळताच सुशांत माझ्या घरी आला आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडला होता. कारण त्याने या चित्रपटासाठी आपली बरीच वर्षे दिली होती आणि याकाळात बर्‍याच मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. याबरोबरच सुशांतने शेखर यांना सांगितले होते की,  त्याने यशराजसोबतचा करार तोडल्यानंतर त्याला हिंदी सिनेसृ्ष्टीत चांगली वागणूक दिली जात नाहीये. 

मुंबई पोलिसांनी सुशांतची आत्महत्या ही सिनेसृ्ष्टीतील गटबाजीमुळे झाली का? हे तपासण्यासाठी आत्तापर्यंत 30 पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. शेखर कपूर हे सध्या मुंबईत नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी इमेल द्वारे दिली आहेत.

 • 10 वर्षांपासून अपूर्ण आहे 'पानी' हा प्रोजेक्ट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेखर यांनी आपल्या जबाब सांगितले की, 'पानी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता जो गेल्या 10 वर्षांपासून अपूर्ण आहे आणि सुशांतच्या निधनानंतर कदाचितच आता कोणी त्याची जागा घेऊ शकेल. 2012-13 या काळात दीडशे कोटींच्या बजेटमध्ये हा मेगा बजेट चित्रपट तयार करण्यासाठी आदित्य चोप्रा आणि मी यशराज फिल्म्समध्ये भेटलो आणि यशराज यांच्या बॅनरखाली हा चित्रपट 2014 पासून सुरु होईल असा निर्णय घेण्यात आला. आम्हाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या', असे शेखर कपूर म्हणाले. 

 • यशराज स्टुडिओत पहिली भेट झाली होती 

शेखर कपूर यांनी पुढे सांगितल्यानुसार, 'चित्रपटाच्या कास्टसाठी सुशांतसोबतची माझी पहिली भेट यशराजच्या स्टुडिओमध्ये झाली होती. यशराज फिल्म्सने चित्रपटासंदर्भात प्री-प्रॉडक्शन काम सुरू केले आणि जवळपास निश्चित झाले की, 150 कोटींचा हा मेगा बजेट चित्रपट 3 ते 4 वर्षांत पूर्ण होईल. प्री-प्रॉडक्शनमध्ये यशराजने सुमारे 5 ते 7 कोटी रुपये खर्च केले होते आणि आम्ही सुशांतच्या तारखादेखील घेतल्या होत्या.'

 • सुशांतने चित्रपटावर, भूमिकेवर काम सुरु केले होते

शेखर कपूर यांनी सांगितले की, सुशांत पानी या चित्रपटात गोरा ही भूमिका साकारणार होता. त्यांनी लिहिले, 'सुशांतने चित्रपटातील गोराच्या भूमिकेवर काम सुरु केले होते. तो या भूमिकेसाठी जणू समर्पित झाला होता. वर्कशॉपदरम्यान त्याचे अभिनय कौशल वाखाण्याजोगे होते. चित्रपटाच्या निर्मिती संदर्भातल्या बैठकींमध्येसुद्धा तो माझ्या आणि यशराजच्या टीमबरोबर रहायचा आणि बारीकसारीक गोष्टी समजून घेत होता.'

 • 'सुशांतने पानीसाठी बरेच चित्रपट सोडले'

शेखर म्हणाले, 'चित्रपटासंदर्भात झालेल्या भेटीतून आमच्यात हळूहळू मैत्री झाली आणि माझे खूप चांगले मित्र बनलो. वैयक्तिक आयुष्यापासून ते क्वांटम फिजिक्सपर्यंत विविध विषयांवर आम्ही चर्चा करायचो. तो त्याच्या भूमिकेबद्दल प्रत्येक लहान गोष्ट विचारत असे. या प्रोजेक्टसाठी त्याने अनेक चित्रपट सोडले होते.'

 • चित्रपटाच्या आशयाबद्दल माझे आणि आदित्य यांची विचारसरणी वेगळी होती

शेखर यांनी आपल्या जबाबात पुढे सांगितले, 'या सर्व बाबींमध्ये चित्रपटाच्या कटेंटवर माझी आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचे विचार पूर्णपणे भिन्न होते. आम्ही एकमेकांशीही सहमत नव्हतो. 'पानी' हा चित्रपट बनला नाही,  कारण कदाचित मला या कथेच्या कुठल्याही प्रकारात किंवा पैलूमध्ये बदल नको होता.'

 • अखेरीस चित्रपट बनवण्याची योजना रद्द झाली

'जेव्हा दोन सर्जनशील एकत्र बसतात तेव्हा त्यांची विचारसरणी वेगळी असू शकते.  माझे आणि आदित्य चोप्रा यांचेही मत भिन्न होते. दरम्यान एक दिवस चित्रपटातील कंटेटवरुन आदित्य चोप्रा आणि माझ्यात काही वाद झाले. आदित्य चोप्रांच्या यशराजने या चित्रपटातून अंग काढून घेतले. त्यामुळे हा चित्रपट यशराजपासून वेगळा झाला.' 

 • सुशांतला हे कळताच तो कोलमडला

सुशांतला जेव्हा हे समजले की हा चित्रपट तयार होणार नाही तेव्हा पूर्णपणे कोसळला. त्यादिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे आला. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तो ढसाढसा रडला. त्याला रडताना पाहून मलादेखील अश्रू अनावर झाले होते. या चित्रपटात माझ्यापेक्षा सुशांत जास्त गुंतला होता हे मला जाणवले. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रोजेक्ट बंद पडल्याचा त्याला खूप मोठा धक्का बसला होता, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला होता. मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विश्वास दिला की, तो हे पात्र पडद्यावर जगेल आणि यात हताश होण्याची गरज नाही. फक्त योग्य वेळेची वाट बघायला हवी.' 

 • सुशांतबरोबर कोणताही निर्माता हा चित्रपट करण्यास तयार नव्हता

'अडचण ही होती की, चित्रपटाचे बजेट खूप जास्त होते. दुस-या प्रॉडक्शन हाऊससोबत आम्ही चर्चा केली. मात्र सुशांतला घेऊन चित्रपट करण्यास कुणीही तयार झाले नाही. त्यांना प्रसिद्ध चेहरा हवा होता. आणि या सर्व गोष्टी सुशांतला नैराश्येत ओढणा-या होत्या. मी त्याच्यासोबत दुसरा चित्रपट बनवण्याचा विचार केला होता, पण ते होऊ शकले नाही.'

 • 'तो स्वत:ला सावरु शकला नाही'

'पानी हा प्रोजेक्ट न बनल्याने त्याला नैराश्याने ग्रासले जे त्याच्या व्यावसायिक जीवनात अडचणीचे कारण बनले. कारण तो अभिनेता होता ज्याला इंडस्ट्रीचा व्यवसाय समजू शकत नव्हता. काही काळाने मीसुद्धा भारत सोडून लंडनला गेलो, पण तो सतत माझ्या संपर्कात होता. मी याकाळात त्याच्याशी 'पानी'बद्दल बोलणे टाळले, कारण तो यातून स्वतःला सावरु शकत नव्हता.'

 • यशराजपासून विभक्त होताच त्याला सावत्र वागणूक मिळू लागली होती

 'काही काळानंतर जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा सुशांतने यशराजबरोबरचा करार मोडला होता. इंडस्ट्रीकडून आता चांगली वागणूनक मिळत नसून नियोजित पद्धतीने चांगले चित्रपट हातून काढून घेतले जात असल्याचे त्याने मला सांगितले होते. तू फक्त काम करत राहा आणि चांगल्या स्क्रिप्ट्सकडे लक्ष दे. यातून लवकरच बाहेर पडशील, असे मी त्याला म्हटले होते.'

 •  'मला माहित होते की तो निराश आणि संभ्रमात आहे'

शेखर कपूर म्हणाले, 'मी गेल्या 6-8 महिन्यांपासून त्याच्याशी संपर्कात नव्हतो, परंतु मला माहित आहे की ती नैराश्यात आणि संभ्रमात आहे. परंतु, तो डीप डिप्रेशनमध्ये गेल्याची मला पूर्ण कल्पना नव्हती आणि जेव्हा मला त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली तेव्हा मला धक्का बसला.'

 • शेखर मुंबईत परतण्याची वाट बघत आहेत पोलिस

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर कपूर यांनी या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या माहिती आपल्या इमेलमध्ये शेअर केल्या आहेत. तथापि, त्यांच्या तथ्यांची पडताळणी बाकी आहे, म्हणून ते शेअर केले जाऊ शकत नाहीत. यामुळेच पोलिसांना शेखर कपूर यांनी मुंबईत येऊन चौकशीस सहकार्य करावे व आपला जबाब नोंदवावा अशी पोलिसांचे म्हणणे आहे.  

0