आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विवेक अग्निहोत्रीची टीका:न्यूज चॅनल्सविरोधात याचिका करणा-या 34 निर्मात्यांना विवेकने म्हटले ढोंगी, म्हणाले - जेव्हा त्यांच्या मुलांच्या सुसू-पॉटीच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा त्यांना आनंद व्हायचा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याचिका करणा-या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव गोवल्यामुळे बाॅलिवूडमधील चार संघटना आणि 34 दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी एकत्रितरीत्या सोमवारी दिल्ली हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ चॅनल्सला अपमानास्पद शेरेबाजी करण्यापासून राेखण्याची मागणी केली आहे. यानंतर चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याचिका करणा-या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांना अपयशी आणि ढोंगी म्हटले आहे. त्यांनी लिहिले, जेव्हा त्यांच्या मुलांच्या सुसू-पॉटीच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा त्यांना खूप चांगले वाटायचे. मात्र आज जेव्हा चाहते आणि प्रेक्षक प्रश्न उपस्थित करत आहेत, तर त्यांना त्रास होतोय.

विवेकने विचारले होते- जनताही केस करू शकते का?
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर विवेकने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, "पब्लिकसुद्धा संगीत, गाण्याचे बोल, भाषा, सर्जनशीलता आणि भारताची संस्कृती मिटविण्याबद्दल बॉलिवूडवर खटला दाखल करु शकतात का?", असा प्रश्न उपस्थित केला होता.

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात दाखल केली आहे याचिका

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात विरोधात अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. बॉलिवूडमधील व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांसह हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी खटल्यात आहे. रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी आणि टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नविका कुमार व अज्ञात प्रतिवाद्यांसह सोशल मीडियावरही अपमानजनक टिप्पण्या थांबवण्याची मागणी आहे.

या निर्मिती संस्था : याचिका दाखल करणाऱ्या निर्मात्यांत बाॅलिवूडमधील सर्वच प्रख्यात प्राॅडक्शन हाऊसचा समावेश आहे. यात आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, साेहेल खान, अॅडलॅब्ज फिल्म्स, अजय देवगण फिल्म्स, आंदाेलन फिल्म्स, अनिल कपूर, अरबाज खान, आशुताेष गाेवारीकर, धर्मा प्राॅडक्शन्स, नाडियादवाला, राेहित शेट्टी, विनाेद चाेप्रा यांच्यासह यशराज फिल्म्स आदींचा समावेश आहे.