आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंडित जसराज यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार:20 ऑगस्ट रोजी पंचत्वात विलीन होतील संगीत मार्तंड पंडित जसराज, न्यू जर्सीहून मुंबई आणण्यात आले पार्थिव

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पंडित जसराज यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
 • पंडित जसराज यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज यांचे 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.15 वाजता न्यू जर्सी येथे निधन झाले. पंडितजींचे पार्थिव बुधवारी मुंबईला पोहोचले. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंडित जसराज यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे 20 ऑगस्ट रोजी राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. पंडित जसराज यांची वयाच्या 90 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. पद्म विभूषण पंडित जसराज काही काळापासून आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत वास्तव्याला होते.

पंडित जसराज यांच्या पश्च्यात कुटुंबात मुलगा सारंग, मुलगी दुर्गा, नातवंडं स्वरा शर्मा, अवनी जसराज मेहरा, ऋषभ देव पंडित आणि ईश्वरी पंडित हे आहेत.

 • मेवाती घराण्याशी होते संबंधित

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला. मेवाती घराण्याशी संबंध असलेले जसराज हे गेल्या 80 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

 • पंडित जसराज यांच्या नावाने ग्रह

शास्त्रीय गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या पंडित जसराज यांच्या नावाने एक ग्रहही अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मधे असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असे ठेवले आहे. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय कलावंत ठरले. या ग्रहाचा शोध 2006 मध्ये लागला होता.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार

 • पद्मश्री पुरस्कार
 • संगीत अकादमी पुरस्कार
 • पद्मविभूषण
 • पु.ल. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार
 • भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
 • गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार