आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन:अखेर करिश्मा प्रकाश NCB समोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात; घरातून ड्रग्ज जप्त झाल्यापासून होती फरार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीकडून तिची चौकशी सुरु झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. घरातून ड्रग्ज जप्त झाल्यापासून करिश्मा फरार होती. मात्र आज ती एनसीबीसमोर हजर झाली आहे. मागील काही दिवसांपासून एनसीबी करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावत होती. मात्र, करिश्मा एनसीबीसमोर हजर होत नव्हती. इतके दिवस ती कुठे होती याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. एनसीबीकडून तिची चौकशी सुरु झाली आहे.

  • 7 नोव्हेंबरपर्यंत करिश्माला अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई सेशन कोर्टाने करिश्मा प्रकाशला 7 नोव्हेंबरपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला आहे. यासोबत कोर्टाने करिश्मा प्रकाशला एनसीबीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढची सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन वेळा करिश्माला समन्स बजावले होते. मात्र ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. त्यानंतर गुरुवारी तिच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या मंगळवारी तिच्या घरातून 1.8 ग्रॅम बंदी असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर, करिश्माला बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले. दिवसभर एनसीबीच्या अधिका-यांनी तिची वाट पाहिली. पण ती हजर झाली नव्हती. यानंतर अटक टाळण्यासाठी करिश्मा प्रकाशने शनिवारी एनडीपीएस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

  • घरात मिळाल्या होत्या सीबीडी ऑइलच्या तीन बाटल्या

करिश्माच्या घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अत्यंत अल्प प्रमाणात असले तरी, यासाठी तिला अटक केली जाऊ शकते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या या घरातून सीबीडी तेलाच्या तीन बाटल्याही जप्त केल्या.

  • रेड दरम्यान करिश्मा घरी नव्हती

एनसीबीने मंगळवारी करिश्माच्या घरी छापा टाकला. मात्र या कारवाईच्या वेळी करिश्मा घरी नव्हती. त्यामुळे एनसीबीने समन्स तिच्या घराबाहेर चिकटवले होते. करिश्मा ड्रग्ज पॅडलरच्या सतत संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. करिश्माच्या ज्या घरावर कारवाई झाली ती तिचे दुसरे घर आहे. या घरी तिचे येणे-जाणे असते, असे सांगितले जाते. मात्र तिच्या वकीलांनी ती येथे राहात असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होता. यापूर्वी एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली.

  • करिश्मा प्रकाशने नोकरीचा दिला राजीनामा

करिश्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची टॅलेंट मॅनेजर होती आणि ती टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वान मध्ये कार्यरत होती. मात्र ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर तिने नोकरीचा राजीनामा दिला आहे. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "करिश्मा आता एजन्सीमध्ये काम करत नाही. तिने 21 ऑक्टोबरला आपला राजीनामा पाठवला आहे. दीपिका पदुकोण आणि इतर कलाकारांसोबतचे तिचे संबंध क्वानची कर्मचारी म्हणून होते." विशेष म्हणजे करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला कामावरुन काढल्याची चर्चा रंगली आहे.

  • ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका-करिश्माचे नाव कसे आले?

करिश्मा प्रकाश सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी क्वानमध्ये काम करायची. ही कंपनी 40 बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. तपासादरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅट्सची माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले.