आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये आणखी एक संसार मोडला:अखेर रणवीर शौरी आणि कोंकणा सेन कायदेशीररित्या विभक्त, पाच वर्षांपासून राहात होते वेगळे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी रणवीर शौरी आणि कोंकणा सेन यांचा घटस्फोट मंजुर झाला.

बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन आणि अभिनेता रणवीर शौरी अखेर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. कोंकणा आणि रणवीर यांचा दोन महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेणार होते. मात्र काही कागदोपत्री कारवाईमुळे ही तारीख 13 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली गेली होती. अखेर गुरुवारी दोघांचा घटस्फोट मंजुर झाला.

  • 2015 पासून वेगळे राहात होते

कोंकणा आणि रणवीर हे 2015 पासून वेगळे राहात होते. 2015 मध्ये तितली या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी स्वतः रणवीरने कोंकणासोबत नात्यात नसल्याचे सांगितले होते, शिवाय हे नाते तुटण्यासाठी आपण स्वतः जबाबदार असल्याचेही तो म्हणाला होता.

फाइल फोटो - मुलासोबत रणवीर आणि कोंकणा सेन
फाइल फोटो - मुलासोबत रणवीर आणि कोंकणा सेन
  • मुलाची मिळणार जॉईंट कस्टडी

या दोघांना हारून नावाचा 7 वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणात घटस्फोटानंतर मुलाचा ताबा कुणाकडे असेल, यावरुन त्यांच्यात वाद नाहीये. रणवीर आणि कोंकणा मुलाची जॉईंट कस्टडी घेणार आहेत, जेणेकरुन मुलाला आईवडिलांची कमतरता भासणार नाही.

फाइल फोटो - कंगना आणि रणवीर यांच्या लग्नाचे क्षण
फाइल फोटो - कंगना आणि रणवीर यांच्या लग्नाचे क्षण
  • 2010 मध्ये झाले होते लग्न

कोंकणा आणि रणवीरने 2007 साली डेटिंगला सुरुवात केली होती आणि 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांनी 'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्स्ड डबल', 'आजा नाचले' आणि 'गौर हरि दास्तान' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...