आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल जैनविरोधात FIR दाखल:कॉश्च्युम स्टायलिस्टचा बलात्काराचा आरोप; गायक म्हणाला - मी महिलेला ओळखत नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही

गायक आणि संगीतकार राहुल जैन याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 30 वर्षीय कॉश्च्युम स्टायलिस्टने राहुलविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र राहुलने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, राहुलने सोशल मीडियाद्वारे माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या कामाचे कौतुक केले. त्याने मला त्याच्या मुंबईतील घरी बोलावले आणि त्याचा पर्सनल कॉश्च्युम स्टायलिस्ट म्हणून नियुक्त करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी मी त्याच्या घरी गेले असता त्याने माझ्यावर बलात्कार केला, असे तक्रारदाराने पोलिसांना नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे.

आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मुंबईत फ्रीलान्स कॉश्च्युम स्टायलिस्ट म्हणून काम करते. तिने विरोध केल्यावर जैनने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत जैनविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

यापूर्वीही एका महिलेने असेच आरोप केले होते - राहुल
दुसरीकडे राहुल जैनने त्याच्यावरील आरोप नाकारले असून, महिलेला आपण ओळखत नसल्याचे सांगितले आहे. ETimes शी बोलताना राहुल म्हणाला, महिलेचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला तिची साथीदार असू शकते, असे रालुचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल जैन विरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...