आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणे पडले महागात:अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीविरुद्ध एफआयआर दाखल; लॉकडाऊनदरम्यान ते मुंबई बसस्टँडवर गाडीने फिरत होते

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांनी मंगळवारीही त्यांना रोखले होते

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 15 जून लॉकडाऊन वाढवले आहे. अनावश्यकपणे बाहेर पडणाऱ्यांवर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारण 1 जूनला दुपारी 2 वाजता ते दोघेही मुंबईतील बसस्टँडवर गाडीने फिरताना पकडले गेले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, ते कोणतेही ठोस कारण सांगू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रे तपासून त्यांना सोडून दिले.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आली नाही. कारण हा जामीनपात्र गुन्हा आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये वाढ करत 15 जूनपर्यंत वाढवले होते. यामध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी मंगळवारीही त्यांना रोखले होते
माध्यमांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांना मंगळवारी एका चेक पाइंटवर अडवले होते. दरम्यान, ते दोघेही जिममधील सत्र संपवल्यानंतर ड्राईव्हवर बाहेर पडले होते. दिशा पुढच्या सीटवर बसलेली होती तर टायगर मागच्या बाजूला बसला होता. मुंबई पोलिसांनी यावेळी त्या दोघांची आधार कार्ड तपासत इतर औपचारिक गोष्टी पूर्ण करत त्यांना सोडून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...