आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद सोमन अडचणीत:गोव्याच्या बीचवर नग्न होऊन धावणे मिलिंद सोमनला पडले महागात, अश्लीलतेच्या आरोपासह एफआयआर झाला दाखल; वाढदिवशी ट्विटरवर पोस्ट केला होता फोटो

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूनम पांडेला अटकेनंतर उठली होती मिलिंद सोमनवर कारवाईची मागणी

मिलिंद सोमनला गोव्याच्या बीचवर नग्न धावणे महागात पडले आहे. त्याने 4 नोव्हेंबर अर्थात त्याच्या वाढदिवशी हा स्टंट करून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याच प्रकरणात गोव्यातील कॉन कोन पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा आरोप मिलिंदवर करण्यात आला आहे. हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुंवर हिने क्लिक केला होता.

पूनम पांडेच्या अटकेनंतर उठली होती मिलिंद सोमनवर कारवाईची मागणी

उल्लेखनीय बाब म्हणजे, मिलिंद सोमन सोबतच वादग्रस्त अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेवर अश्लीलता प्रकरणी कारवाई झाली होती. तिने गुरुवारी एका सरकारी परिसरात कथित अश्लील फोटोशूट केले होते. या प्रकरणात तिला आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर जामिनावर सोडण्यात आले. तिच्यावर कारवाई झाल्यानंतर मिलिंद सोमनला अटक का झाली नाही असा सवाल काहींनी उपस्थित करून दोन्ही घटनांची तुलना केली होती.

दरम्यान, मिलिंदवर भारतीय दंड विधान कलम 294 (सार्वजनिक स्थळी अश्लीलता) आणि आयटी कायद्याअंतर्गत कलम 167 (सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट) या कलमा लावण्यात आल्या आहेत. हा गुन्हा सिद्ध झाल्यास 3 महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणी मिलिंदची चौकशी आज केली जाऊ शकते.

गोवा सुरक्षा मंचच्या वतीने तक्रार

गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने वास्को पोलिस स्टेशनमध्ये अभिनेता आणि मॉडेल मिलिंदच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामध्ये मिलिंदने अपलोड केलेल्या फोटोंमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर वाढदिवशी टाकली होती फोटो पोस्ट

सोशल मीडियावर हा फोटो अपलोड झाल्यानंतर अनेकांनी मिलिंदला ट्रोल देखील केले होते. काहींनी त्याचे फोटो एडिट करून त्याला कपडे घालण्याचाही प्रयत्न केला. तर काहींनी त्याची थट्टा उडवताना विविध प्रकारच्या फोटो एडिटिंग केल्या होत्या. या मीम्स देखील आपण एंजॉय करत असल्याचे मिलिंद आणि त्याच्या पत्नीने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...