आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुरवर आरोप:‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम मधुर मित्तलविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल, 15 वेळा गर्लफ्रेंडचा गळा आवळण्याचा केला प्रयत्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रागीट स्वभावाचा आहे मधुर मित्तल

‘स्लमडॉग मिलेनिअर’ या गाजलेल्या चित्रपटात सलीम मलिकची भूमिका वठवणारा अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील खास पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने ही तक्रार नोंदवली आहे. अद्याप या प्रकरणी मधुरला अटक झाली नसल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 फेब्रुवारीची आहे.

रागीट स्वभावाचा आहे मधुर मित्तल
वृत्तानुसार, पीडिताचे वकील निरंजन शेट्टी यांनी सांगितल्यानुसार, पीडिता आणि मधुरची गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भेट झाली होती. भेटीनंतर 15 दिवसांच्या आतच त्याने दारुच्या नशेत पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. 11 फेब्रुवारी रोजी पीडिता आणि मधुर यांचे ब्रेकअप झाले होते. परंतू 13 फेब्रुवारीला मधुरने तरुणीच्या घरात घुसून तिला मारहाण केली, असे तरुणीच्या वकिलांनी सांगितले.

मधुर खूप जास्त रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट तिच्या घरात घुसला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानाखाली लावल्या. इतकेच नाही तर 15 वेळा त्याने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे केस, कान ओढले. तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सध्या जयपूरमध्ये आहे मधुर मित्तल
इतकेच नाही तर मधुर पुन्हा 15 फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी पोहोचला होता. मात्र पीडितेच्या वकिलाने त्याला तेथून जाण्यास सांगितले. मारहाण करुन जखमी करणे आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधुरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मधुर सध्या जयपूरमध्ये असून येथे तो एका वेब सीरिजचे चित्रीकरण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...