आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:'बिग बॉस 15'च्या सेटवर भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या शो 'बिग बॉस 15' च्या सेटवर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सेटवरील अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
अग्निशमन दलाच्या गाड्या 'बिग बॉस 15' च्या सेटवर पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. बिग बॉसच्या सेटवरील एक व्हिडिओही खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी दिसत आहेत. सेटवर अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. बिग बॉसचा सेट मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये आहे.

बिग बॉसच्या सेटवर यापूर्वीही अपघात
मागच्या वर्षी बिग बॉसच्या सेटजवळ अपघातात एका स्टाफचा मृत्यू झाला होता, त्याचे नाव पिस्ता धाकड होते. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची ती टॅलेंट मॅनेजर होती. 'वीकेंड का वार'चे शूटिंग पॅकअप झाल्यानंतर पिस्ता तिच्या घरी जात होती. त्यादरम्यान त्यांची दुचाकी घसरून व्हॅनिटीच्या टायरखाली आली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

तेजस्वी प्रकाश ठरली होती विजेती
'बिग बॉस 15' बद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी शोचा फिनाले झाला, ज्यामध्ये तेजस्वी प्रकाश विजेती ठरली. या शोमध्ये माजी स्पर्धकांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी आणि स्पर्धकांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. या सीझनमध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राखी सावंत, रितेश, डोनल बिश्त, विधी पंड्या, रश्मी देसाई, सिंबा नागपाल, अफसाना खान आणि उमर रियाझ दिसले.

बातम्या आणखी आहेत...