आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • First Glimpse Of Jeh: Younger Son Jahangir Ali Khan Looks Exactly Like Kareena Kapoor, Captured In Camera For The First Time With Papa Saif

सैफिनाच्या मुलाची पहिली झलक:हुबेहुब करीना कपूरसारखा दिसतो धाकटा मुलगा जहांगीर अली खान, पहिल्यांदा कॅमे-यासमोर वडिलांच्या कडेवर दिसला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जहांगीर हुबेहूब करीनासारखा दिसतो.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने 21 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आपल्या या मुलाचे नाव सैफ आणि करीना यांनी जहांगीर अली खान असे ठेवले आहे. पहिला मुलगा तैमूर हा पापाराझीचा आवडता स्टार किड आहे, त्यामुळे या जोडप्याचे सर्व चाहते त्यांच्या दुसऱ्या मुलाची पहिली झलक बघण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. अलीकडेच करीना कपूर आणि सैफ अली खान मुलगा जहांगीरसोबत रणधीर कपूर यांच्या घरी गेले, जेथे हा चिमुकला पहिल्यांदा पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

समोर आलेल्या छायाचित्रात जहांगीर त्याचे वडील सैफच्या कडेवर दिसत होता. स्काय ब्लू रंगाच्या रॉम्परमध्ये तो खूपच गोंडस दिसतोय. इतकेच नाही तर छायाचित्र समोर येताच प्रत्येकाने त्याच्या लूकची तुलना करीना कपूर खानच्या बालपणाच्या लूकशी केली आहे. तैमूरमध्ये त्याचे वडील सैफची प्रतिमा दिसते तर जहांगीर हुबेहूब करीनासारखा दिसतो. करीनाने तिच्या प्रेग्नेंसी बायबलमध्ये हे उघड केले आहे.

करीनाने अलीकडेच तिच्या गर्भधारणेच्या प्रवासावर प्रेग्नेंसी बायबल पुस्तक लाँच केले. या पुस्तकात करीनाने सांगितले की, ती तैमूरचे जुने कपडे आणि सामान जहांगीरसाठी वापरते. करीनाला कायमच दुसरे मूल हवे होते, त्यामुळे तिने तैमूरचे सामान जपून ठेवले होते.

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यावरून सैफिना झाले ट्रोल

सैफ आणि करीनाच्या लहान मुलाचे खरे नाव जहांगीर आहे, हे समजल्यावर लोकांनी सोशल मीडियावर सैफिनाला ट्रोल करायला सुरुवात केली आणि मीम्सचा पाऊसही पाडला.एका नेटक-याने लिहिले, "तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार?' तर एक नेटकरी म्हणाला, "करीना आणि सैफ मुलाचे नाव कलाम. इरफान, जाकीर काहीही ठेवू शकले असते. मात्र तैमूर आणि जहांगीर का ठेवले? तर शिख आणि हिंदूंना कमी लेखण्याचा हा एक डाव आहे. असे वाटतंय करीना आणि सैफ मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत," असे म्हणत यूजर्सनी त्यांना ट्रोल केले होते.

बातम्या आणखी आहेत...