आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानचा आगामी चित्रपट:‘अंतिम : द फायनल ट्रूथ’च्या सेटवरुन शीख पोलिस बनलेल्या सलमानचा फर्स्ट लूक झाला रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुष शर्माने सलमानता लूक रिलीज करत एक व्हिडिओ शेअर केला.

अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटातील त्याचा शीख पोलिसाच्या भूमिकेतील लूक रिलीज झाला आहे. त्याचा मेहुणा आयुष शर्माने लूक रिलीज करत एक व्हिडिओ शेअर केला. या टीजर व्हिडिओमध्ये सलमानने निळा शर्ट आणि ग्रे पँट घातली आहे आणि डोक्यावर पगडी घालत वाढलेल्या दाढीत दिसत आहे.

वृत्तानुसार, 16 नोव्हेंबरपासून पुण्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत आयुष शर्माने याचे चित्रीकरण केले. तर सलमान खान दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणावर रुजू झाला आहे. हा चित्रपट प्रवीण तरडेंच्या गाजलेल्या मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असून याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत.

‘राधे’मध्ये ड्रग माफिया बनलेल्या रणदीपसोबत फाइट करणार सलमान
‘अंतिम’सह ‘राधे: द मोस्ट वाँटेड भाई’मध्ये सलमान दिसणार आहे. यात तो ड्रग माफिया बनलेलया रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. रणदीप यात गोवाचा ड्रग डीलर बनला आहे, जो सायको असतो. चित्रपटात सलमान आणि रणदीपमध्ये एक स्मोक फाइट सिक्वेन्सदेखील आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser