आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीची नवीन इनिंग:महेंद्र सिंह धोनीच्या 'अथर्व: द ओरिजिन' या अ‍ॅनिमेटेड ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक आउट, टीझर सोशल मीडियावर व्हायरल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'धोनी एंटरटेन्मेंट'ने 2020 मध्ये केली होती या ग्राफिक नॉवेलची घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने बुधवारी त्याच्या आगामी अ‍ॅनिमेटेड ग्राफिक नॉवेल 'अथर्व: द ओरिजिन'मधील त्याचा पहिला लूक जारी केला. धोनीने स्वतः त्याच्या या माइथोलॉजिकल सायन्स फिक्शन नॉवेलचा फर्स्ट लूक टीझर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. या टीझरमध्ये धोनी अघोरी 'अथर्व'च्या भूमिकेत दिसत आहे.

महेंद्र सिंह धोनीने 'अथर्व: द ओरिजिन'चा फर्स्ट लूक टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "माझा नवीन अवतार... 'अथर्व'ची घोषणा करताना आनंद होतोय." टीझरमध्ये धोनीला युद्धभूमीवर अ‍ॅनिमेटेड अवतार 'अथर्व' म्हणून दाखवण्यात आले आहे. या ग्राफिक नॉवेलच्या टीझरमध्ये माजी क्रिकेटरचे पात्र अघोरी 'अथर्व' राक्षसांच्या सैन्याशी लढताना दिसत आहे. धोनीच्या नॉवेलचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे.

रमेश थमिलमनी यांच्या पुस्तकाचे रूपांतर आहे 'अथर्व: द ओरिजिन'
धोनीच्या 'अथर्व: द ओरिजिन'ला 'न्यू एज ग्राफिक नॉवेल' म्हणून बघितले जात आहे. ही कादंबरी नवोदित लेखक रमेश थमिलमनी यांच्या त्याच नावाच्या अप्रकाशित पुस्तकाचे रूपांतर आहे. या कादंबरीला 'धोनी एंटरटेन्मेंट'ने पाठिंबा दिला आहे. या मीडिया कंपनीची स्थापना धोनी आणि त्याची पत्नी साक्षी सिंह धोनी यांनी 2019 मध्ये केली होती. या ग्राफिक कादंबरीची निर्मिती विरजू स्टुडिओ आणि मिडास डील प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे.

'धोनी एंटरटेन्मेंट'ने 2020 मध्ये केली होती या ग्राफिक नॉवेलची घोषणा
या 'न्यू एज ग्राफिक नॉव्हेल'ची घोषणा 2020 मध्ये 'धोनी एंटरटेनमेंट'ने केली होती. धोनीची पत्नी साक्षी 'धोनी एन्टरटेन्मेंट'ची व्यवस्थापकीय संचालक आहे. तिनी या कादंबरीचे वर्णन एक थरारक मालिका असे केले आहे. ती म्हणाली, "हे पुस्तक एक पौराणिक विज्ञान कथा आहे, ज्यामध्ये एका रहस्यमय अघोरीचा प्रवास कथन करण्यात आला आहे. यासोबतच या मालिकेद्वारे समाजात सुरू असलेल्या मोठ्या मिथकांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे."

'धोनी एंटरटेनमेंट'च्या माध्यमातून आणखी अनेक प्रोजेक्ट्स आणणार आहेत धोनी-साक्षी साक्षी धोनी पुढे म्हणाली, “आम्ही या विश्वाचे सर्व पैलू अंमलात आणू आणि प्रत्येक पात्र आणि कथा शक्य तितक्या अचूकतेने पडद्यावर आणू याची आम्हाला खात्री करायची आहे. ही सीरिज फीचर फिल्ममध्ये रुपांतरित करण्यापेक्षा आमचा उद्देश अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करते."

धोनी आणि साक्षी यांनी 2019 मध्ये 'धोनी एन्टरटेन्मेंट'द्वारे OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी 'रोर ऑफ द लायन' या त्यांच्या पहिल्या प्रोजेक्ट डॉक्युमेंटरी सीरिजची निर्मिती केली. धोनी आणि साक्षी त्यांच्या मीडिया कंपनीच्या माध्यमातून आणखी बरेच प्रोजेक्ट आणण्याचा विचार करत आहेत.

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
धोनी सध्या भविष्यात चांगली टीम तयार करण्यासाठी 'चेन्नई सुपर किंग्स' (CSK)च्या थिंक टँकसोबत विचारमंथन करत आहे. IPL-2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. धोनीही 'चेन्नई सुपर किंग्स'च्या टेबलावर बसून लिलावात भाग घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

40 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 350 एकदिवसीय, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये 17,266 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन आयसीसी जेतेपदे जिंकण्यात यश आले. तसेच धोनीने CSK ला त्याच्या नेतृत्वाखाली चार वेळा IPL चे विजेतेपद मिळवून दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...