आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#FirstSalary ट्विटरवर होत आहे ट्रेंड:अनुभव सिन्हा यांनी सिगारेटसाठी 80 रुपयांत घेतली होती शिकवणी, हंसल मेहता यांनी कपडे खरेदी करण्यासाठी कमावले होते 450 रुपये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • #First Salary अंतर्गत नेटकरी आपल्या पहिल्या पगाराविषयी सांगत आहेत, 24 तासांत झाले 15,000 हून अधिक ट्विट

ट्विटरवर बुधवारपासून #FirstSalary ट्रेंड होत आहे. यामध्ये नेटकरी त्यांच्या पहिल्या कमाईविषयी सांगत आहेत. हा ट्रेंड फॉलो करत अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या पहिल्या पगाराविषयी ट्विट केले आहे. यात आर्टिकल 15 आणि मुल्क या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यापासून ते मिर्जापूर या वेब सीरिजमधील अभिनेता अली फजल यांनी त्यांना पहिला पगार किती मिळाला होता आणि यासाठी त्यांनी कोणते काम केले होते, याबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊयात, कोणत्या सेलिब्रिटीची किती होती पहिली कमाई

अनुभव सिन्हा
'मुल्क', 'आर्टिकल 15' आणि 'थप्पड' या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर लिहिले, “पहिला पगार -80 रुपये, वय - 18 वर्षे, काम - मी सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्याला गणिताची शिकवणी दिली होती. मी हे पैसे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना स्मोकिंगसाठी कमावले होते.'

हंसल मेहता
'द स्कॅम 1992' ही वेब सीरिज आणि 'छलांग' या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन चर्चेत असलेले हंसल मेहता यांनी ट्विटरवर लिहिले, ''पहिला पगार - दरमहा 450 रुपये, वय - 16 वर्षे, काम - इंटरशॉपी केम्प्स कॉर्नरमध्ये सेल्समन म्हणून जीन्स आणि कॅज्युअल वेअरची विक्री करुन हे पैसे कमावेल होते. यातून मी ज्युनिअर कॉलेजसाठी कपडे खरेदी केले होते.''

अली फजल
अभिनेता अली फजलने आपल्या पहिल्या कमाईचा उल्लेख करताना सांगितले की, त्याचा पहिला पगार 8000 रुपये होता. महाविद्यालयीन फी भरण्यासाठी वयाच्या 19 व्या वर्षी कॉल सेंटरवर काम केले होते. अली सध्या मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये गुड्डू पंडितच्या रूपात दिसत आहे.

शरद केळकर
शरदने ट्विटरवर लिहिले की त्याचा पहिला पगार 2500 रुपये होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने जिम इंस्ट्रक्टर म्हणून हे पैसे कमावले होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या लक्ष्मी या सिनेमातील शरदच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.

पुलकित सम्राट
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘तैश’ चित्रपटात दिसलेल्या पुलकितने सांगितले की, पहिल्या पगाराच्या रूपात त्याला 1500 रुपये मिळाले होते. त्यावेळी तो 16 वर्षांचा होता. हे पैसे त्याने गॅस स्टेशनवर पेट्रो कार्ड विकून कमावले होते.

सयानी गुप्ता
अभिनेत्री सयानी गुप्ताने सोशल मीडियावर लिहिले, ''पहिले पगार: 12500 रुपये, वय- 21 वर्षे, काम-एका पब्लिशिंग हाऊस/ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च फर्ममध्ये मार्केटींग आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह. सयानीने 'आर्टिकल 15', 'फॅन', 'जॉली एलएलबी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मीजान जाफरी

2019 मध्ये 'मलाल' चित्रपटाद्वारे पदार्पण करणारा अभिनेता मीजान याला पहिला पगार म्हणून 15,000 रुपये मिळाले होते. त्याने एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. मीजन हा बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...