आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सिद्धार्थ पिठानीने सुशांतच्या भावोजींनी पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला, म्हणाले होते - 'माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूर ठेव'

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे मेसेेज यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाठवण्यात आले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने सुशांतचे भावोजी ओपी सिंग यांनी त्याला पाठवलेल्या काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. असे म्हटले जात आहे की, ते सुशांतशी संपर्क साधू शकत नव्हते. म्हणून त्यांनी सिद्धार्थ पिठानीच्या फोनवर सुशांतसाठी मेसेज पाठवले होते. हे मेसेेज यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाठवण्यात आले होते.

पहिला मेसेजः 'मी चंदिगढला पोहोचलो आहे. मुंबईत येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मला माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली.'

दुसरा मेसेज: 'मला आनंद आहे की तू तुझ्या करिअरचे निर्णय स्वत: घेत नाही. मी योग्य अंदाज लावला आणि माझ्या प्रवासाचे नियोजन आखले.'

तिसरा मेसेज: 'कृपया माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूर ठेव. तुझी संगत, वाईट सवयी आणि मिसमॅनेजमेंटचा तिला त्रास होईल. मला खात्री करुन घ्यायची आहे की माझ्या पत्नीला त्रास होणार नाही, कारण ती खूप चांगली आहे.'

चौथा मेसेज: 'मी एकमेव आहे जो तुला मदत करू शकेल आणि मी आजही उपलब्ध आहे. जो कोणी तुझी काळजी घेतोय - तुझी मैत्रीण, तिचे कुटुंब किंवा तुझा मॅनेजर - माझ्या कार्यालयातून परस्पर सहमतीची व्यवस्था केली जाऊ शकते.'

पाचवा मेसेज: 'कृपया या मेसेजवर तुझे मत दे. जर तुला हे महत्त्वाचे वाटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष कर. माझ्याकडे चालवण्यासाठी एक सरकार आहे, मॅनेज करण्यासाठी एक डिपार्टमेंट आहे आणि एक कुटुंब आहे, जे मला सांभाळायचे आहे, म्हणून मी वेळ आणि शक्ती वाया घालवू इच्छित नाही.'

सुशांतचे भावोजी ओपी सिंह अतिरिक्त पोलिस महासंचालक असून हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांचे सुशांतची मोठी बहीण राणीशी लग्न झाले आहे.

  • सुशांत कुटुंबाच्या संपर्कात नव्हता

यापूर्वी अंकिता लोखंडेने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, रियाशी संबंध जुळल्यानंतर सुशांत त्याच्या कुटूंबाच्या फारसा संपर्कात नव्हता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा मोठी बहीण राणी सुशांतला भेटण्यासाठी मुंबईच्या घरी गेली होती, तेव्हा सुशांत प्रथम भेटण्यास तयार झाला पण नंतर भेटण्यास नकार दिला. त्यानंतर राणीने अंकिताला सांगितले होते की, सुशांत दबावात आहे, असे तिला वाटते.

बातम्या आणखी आहेत...