आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका मेगा प्रोजेक्टमधून बाहेर:संजय लीला भन्साळींच्या 'बैजू बावरा'साठी दीपिकाने रणवीर एवढेच मागितले मानधन, चित्रपटातून झाली बाहेर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिका मानधनावर ठाम होती

अभिनेत्री दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळी यांच्या मेगा प्रोजेक्ट बैजू बावरामधून बाहेर पडल्याच्या बातम्या आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, दीपिकाने पती रणवीर सिंहच्या बरोबरीने फी मागितली होती. यानंतर तिला प्रोजेक्टमधून वगळण्यात आले आहे.

दीपिका मानधनावर ठाम होती
रिपोर्टनुसार, रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे आणि भन्साळींनी मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोणशी बोलणी केली होती. या बातमीनंतर चाहत्यांना पद्मावत चित्रपटानंतर पुन्हा एकदा 3 दिग्गजांना एकत्र बघण्याची उत्सुकता होती. पण आता असे होणार नाहीये.

चित्रपटाच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाने चित्रपटासाठी रणवीर इतकेच मानधन मागितले होते. ती आपल्या मानधनातील एक रुपयाही कमी करायला तयार नव्हती. निर्मात्यांना मात्र एवढे मानधन देणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे तिची मागणी मान्य झाली नाही आणि त्यामुळे ती आता या चित्रपटातून बाहेर पडली आहे.

आता प्रश्न- दीपिकाची जागा कोण घेणार?

सूत्रांनुसार, दीपिका चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता तिच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर चित्रपटात दोन मेल लीड आहेत. पूर्वी हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांची नावे समोर आली होती. नंतर निर्मात्यांनी रणवीर सिंह आणि कार्तिक आर्यन यांना विचारणा केली. त्यात रणवीर सिंहच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...