आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आपबीती :सावळ्या रंगामुळे बिपाशाला बालपणापासूनच ऐकावे लागले होते टोमणे, म्हणाली, 'माझ्या अभिनयापेक्षा माझा रंगाची जास्त चर्चा व्हायची'

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिपाशा बसूने सावळा रंग असल्याबद्दल बालपणी कसं हिणवलं गेलं, याविषयी आपली आपबीती शेअर केली आहे.

अमेरिकी-आफ्रिकी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिस अत्याचारात 25 मे रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर ब्लॅक लाइव्स मॅटरचे जगभर समर्थन होत आहे. दरम्यान, ब्युटी क्रीमच्या उत्पादनावरूनही भारतात वाद सुरू आहेत. ब्युटी ब्रॅण्डचा भाग झाल्याने अनेक सेलिब्रिटींना टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. हा वाद वाढल्यानंतर आता हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रिममधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बसूने सावळा रंग असल्याबद्दल बालपणी कसं हिणवलं गेलं, याविषयी आपली आपबीती शेअर केली आहे.

  • लहानपणापासूनच टोमणे ऐकले

बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करुन आपबीती सांगितली आहे. ती म्हणते, 'मी लहानाची मोठी होत असताना अनेकदा ऐकले की बोनी सोनीपेक्षा काळी आहे.ती थोडी सावळी आहे ना? माझी आईसुद्धा डस्की ब्युटी होती आणि मीही ब-याच अंशी तिच्यासारखीच दिसते.  माझे नातेवाईक यावर चर्चा का करतात हे मला कधीच कळले नाही.' 

  • नावासोबत जुळला सावळा रंग

पुढे बिपाशा लिहिले, ''मी 15, 16 वर्षांची असताना मॉडेलिंगला सुरुवात केली. मी सुपर मॉडल स्पर्धा जिंकली. प्रत्येक वृत्तपत्रात बातमी होती की, कोलकाताची सावळी मुलगी विजेती ठरली आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटले की, माझ्या नावाचे पहिले विशेषण सावळी हे का आहे. मग मी मॉडेलिंगसाठी न्यूयॉर्क आणि पॅरिसला गेले आणि मला येथे समजले की माझ्या रंगामुळे मला अधिक काम आणि अटेंशन मिळत आहे. हा माझा वेगळा शोध होता'', असे ती सांगते. 

  • माझ्या कामापेक्षा सावळ्या रंगाची अधिक चर्चा

''मी परत आल्यावर मला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. शेवटी मी माझा पहिला चित्रपट केला, मी इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे नवीन होते. अचानक मला येथे स्वीकारले गेले आणि पसंतही केले गेले. परंतु, सावळ्या मुलीने पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले, असं विशेषण जुळले. माझ्यावर आलेल्या बर्‍याच लेखांमध्ये माझ्या कामापेक्षा माझ्या रंगाची जास्त चर्चा होती. मला ते कधीच समजले नाही. माझ्या मते आकर्षक हे व्यक्तीमत्त्व असतं, रंग नव्हे. माझ्या सावळ्या रंगामुळे का मला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे समजले गेले?  मला जास्त फरक समजत नाही परंतु लोक बनवतात'', असे ती म्हणते. 

  • मी कधीच थांबली नाही

''एखाद्या अभिनेत्रीने कसे दिसावे आणि कसे वागावे, यासाठी येथे सौंदर्याची एक मानसिकता आहे. पण मी वेगळे होते. लहानपणापासूनच  माझ्यात आत्मविश्वास आणि अभिमान आहे. माझा त्वचेचा रंग मला परिभाषित करीत नाही. मला ते आवडते आणि मी ते बदलू इच्छित नाही'', असे मत बिपाशाने व्यक्त केले. 

  • अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्यांची ऑफर नाकारली

बिपाशाने सांगितले, गेल्या 18 वर्षांत मला सर्व मोठ्या बजेटच्या स्किन केअर एंडोर्समेंटच्या ऑफर मिळाल्या होत्या, परंतु मी माझ्या तत्त्वांवर ठाम राहिले. हे थांबवणे आवश्यक आहे. आम्ही विक्री करीत आहोत ते  एक खोटे स्वप्न आहे. देशातील बहुतेक लोकसंख्या सावळी आहे. हा ब्रँडचा एक मोठा निर्णय आहे आणि इतरांनीही तो स्वीकारला पाहिजे, असेही ती म्हणाली. 

बिपाशा बसूने 2001 मध्ये दोन चित्रपट नाकारल्यानंतर अजनबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात नकारात्मक भूमिका असूनही तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. 2002 मध्ये आलेला 'राज' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

0