आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘धूम’ सीरिजच्या चौथ्या भागाबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेंचायझीमध्ये जॉन अब्राहम, दुसर्यात हृतिक रोशन आणि तिस-या भागात आमिर खानने जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केले होते. बातमीनुसार आता ‘धूम 4’ मध्ये जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन एकत्र दिसू शकतात. याशिवाय दीपिका पदुकोण या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
पहिल्यांदाच दीपिका आणि जॉनबरोबर दिसणार आहे हृतिक
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "दीपिका आणि हृतिक गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मात्र दोघांनीही अद्यापपर्यंत एकही चित्रपट सोबत केला नाही. यशराज फिल्म्स कित्येक वर्षांपासून या दोघांना एका प्रोजेक्टमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे आता 'धूम 4' च्या माध्यमातून शक्य होणार आहे. जॉन अब्राहमलासुद्धा या चित्रपटात घेण्याची तयारी सुरु आहे. एकीकडे हृतिक पहिल्यांदाच दीपिकाबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, जॉनसोबतही तो पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे."
'धूम 4' ची कथा स्टायलिश चोरावर आधारित असेल
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी सूत्रांनी सांगितले, "आतापर्यंत चित्रपटाच्या फ्रेंचायझी खलनायकाच्या अवतीभोवती होती. मागील तीन भागांत जॉन, हृतिक आणि आमिर यांनी चित्रपटात चोराची भूमिका वठवली होती. मात्र यावेळी चौथ्या भागात प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळाला. यशराज फिल्म्सच्या 'धूम'ला आदित्य चोप्राला आता वेगळ्या उंचीवर नेण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याने मनीष शर्माचीच निवड चित्रपटाच्या पटकथेसाठी केली आहे. 'धूम 4'ची कथा एका सुंदर स्टाईलिश चोरा (दीपिका पदुकोण) वर आधारित असेल. प्रॉडक्शन हाऊसने या तिन्ही कलाकारांच्या शूटिंगच्या तारखांबद्दल चर्चा सुरू केली आहे. जर सर्व काही जुळून आले तर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. हा चित्रपट मनीष शर्माच दिग्दर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे.'
दीपिकापूर्वी निर्मात्यांनी प्रियांकाकडे साधला होता संपर्क
दीपिकापूर्वी निर्मात्यांनी प्रियांका चोप्राकडे या भूमिकेसाठी संपर्क साधला होता. मात्र, प्रियांकाच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे अखेर निर्मात्यांनी दीपिकाला त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कास्ट करण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.