आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • For The First Time That Riya Chakraborty Is Being Questioned By The CBI. Cbi Can Be Asked From Her Relationship With Sushant To Her Professional personal Life

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा आठवा दिवस:सीबीआयकडून पहिल्यांदाच होतेय रिया चक्रवर्तीची चौकशी, सुशांतसोबतच्या नात्यापासून ते प्रोफेशन-पर्सनल आयुष्याशी संबंधित हे 15 प्रश्न विचारले जाऊ शकतात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सीबीआयची टीम रिया आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना समोरासमोर बसवून चौकशी करु शकते.
 • सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या आहे, आणि त्यावर माझा विश्वास आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील सीबीआय चौकशीचा आज आठवा दिवस आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पहिल्यांदा सीबीआयसमोर आली आहे. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविकही आहे. मुंबईतील सांताक्रूजस्थित डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाही उपस्थित आहे. सीबीआय सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिया सकाळी 10.40 वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. येथे सीबीआयची टीम सध्या मुक्कामाला आहे.
रिया सकाळी 10.40 वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. येथे सीबीआयची टीम सध्या मुक्कामाला आहे.

रियाला हे 15 प्रश्न विचारले जाऊ शकतात

 • आपल्या आणि सुशांतच्या नात्याविषयी सांगा. तुमची कधी आणि कुठे भेट झाली होती आणि हे नाते पुढे कसे आले?
 • 8 जून रोजी असे काय घडले की तुम्ही सुशांतचे घर सोडले आणि त्याचा नंबरदेखील ब्लॉक केला?
 • तुम्हाला सुशांतच्या मृत्यूविषयी कुणी सांगितले? त्यावेळी तुम्ही कुठे होता आणि ही बातमी कळल्यानंतर तुम्ही काय केले?
 • सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्या वांद्रास्थित घरी गेला होता का? जर नाही तर त्याचे कारण काय? तुमची शवागाराबाहेरची काही छायाचित्रे समोर आली आहेत, तिथे जाण्याची परवानगी कशी मिळाली?
 • सुशांतच्या घरी तुम्ही कुठल्या नात्याने राहात होत्या? तुम्ही त्याचा संपूर्ण आर्थिक व्यवहार बघत होत्या का? सुशांतचा पिन तुम्हाला कुणी आणि का दिला?
 • सुशांतच्या कुटुंबासोबत तुमचे नाते कसे आहे? त्याच्या वडिलांच्या आणि बहिणींच्या आरोपांवर तुमचे मत काय आहे? तुम्ही खरंच 15 कोटींची हेराफेरी केली आहे का?
 • सुशांतचे घर सोडल्यानंतर 9 ते 14 जून या काळात तुम्हाला कुणी सुशांतच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती का?
 • आपल्या बॉलिवूड प्रवासाविषयी सांगात. एंट्री कशी झाली? कुणी तुम्हाला मदत केली का आणि आजही तुमचा कुणी मेंटॉर आहे का?
 • सुशांत नैराश्यात असल्याचे तुम्हाला सर्वप्रथम कसे समजले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले?
 • सुशांतचा मृत्यू हत्या की आत्महत्या? तुम्हाला काय वाटतं. दोन्ही परिस्थितीत तुम्ही यासाठी कुणाला दोषी समजता.
 • घरी काम करणा-या कर्मचा-यांसोबत सुशांतचे कसे संबंध होते? सुशांत पैशांसंबंधी बेफिकिर राहायचा की स्वतः पैसे काढून कर्मचा-यांना द्यायचा.
 • त्याच्या जवळचे मित्र आणि त्याला नुकसान पोहोचवू शकतील अशा काही निकटवर्तीयांबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?
 • 2017 ते 2020 या काळातील आपले काही चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये ड्रग्जविषयी तुम्ही काही लोकांसोबत बोलला आहात. यावर तुमचे काय स्पष्टीकरण आहे?
 • सुशांत डॉक्टरांकडे जायचा की डॉक्टर घरी यायचे? सुशांत कुठली औषधे घेत होता, त्याचे प्रिस्क्रिप्शन्स कुठे आहेत?
 • सुशांतला बॉलिवूडमधून कुणी त्रास देत होतं का? सुशांतचे कधी कुणाशी भांडण झाले होते का? बॉलिवूडमधून त्याला कुणी नुकसान पोहोचवू शकतं असं तुम्हाला वाटतं का?

रियाच्या वडिलांची केली होती सहा तास चौकशी

याशिवाय सीबीआयचे पथक रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचीही चौकशी करू शकते. गुरुवारी ईडीने त्यांची 6 तास चौकशी केली होती. त्यांना अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत नेऊन प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांच्या लॉकरचा शोधही घेण्यात आला.

सीबीआयने गुरुवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज सिंग आणि केशव यांची 14 तास चौकशी केली. मुंबईतील डीआरडीओ अतिथीगृहात ही चौकशी झाली. शोविकचा जबाबही नोंदवण्यात आला. पिठानीची एजन्सीने सलग सातव्या दिवशी चौकशी केली.

 • एम्स आज सुशांतच्या पोस्टमार्टमचा फॉरेन्सिक अहवाल सादर करू शकते

सुशांतच्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाची फॉरेन्सिक तपासणी करणारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आज सीबीआयला आपला अहवाल सादर करू शकते. असेही बोलले जात आहे की एम्सची टीम सोमवारी मुंबईला भेट देऊ शकते. हे पथक शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेणार आहे. गुरुवारी एम्समधील फॉरेन्सिक तपासणी पथकाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालात बर्‍याच गोष्टी अपूर्ण असल्याचे सांगितले होते. आता खुनाच्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम मुंबईतील कूपर रुग्णालयात झाले.

 • एनसीबीची टीम 20 जणांची चौकशी करेल

दरम्यान, दिल्लीहून मुंबई येथे दाखल झालेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम आजपासून ड्रग्स अँगलबाबत याप्रकरणी चौकशी सुरू करणार आहे. रियाचे चॅट्स समोर आल्यानंतर एनसीबीने रियासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चॅटमध्ये ड्रग्ज घेण्यासंबंधी आणि कुणालातरी त्याच्या नकळत ते दिल्यासंबंधीचा उल्लेख आहे.

एनसीबीच्या पथकाने औषध पुरवठा प्रकरणातील 20 संशयितांची यादी तयार केली असून त्यात चक्रवर्ती कुटुंबाचा समावेश आहे. ज्यात गोव्याचे व्यापारी गौरव आर्य, सेव्ह लोहिया, क्वान एंटरटेन्मेंटची भागीदार जया साहा, बिग बॉसचे माजी स्पर्धक एजाज खान, फारूक बटाटा आणि बकुल चांदानी यांचा समावेश आहे. इतर लोकांची नावेही समाविष्ट आहेत. एनसीबी या सर्व लोकांची चौकशी करेल.

अपडेट्स

 • रियासोबत ड्रग्जसंदर्भात संभाषण करणा-या गौरव आर्याला ईडीने 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याची नोटिस दिली आहे. ईडीने गौरवच्या गोव्यातील हॉटेल द टॅमेरिंड येथे ही नोटिस दिली आहे.
 • सुशांतचे चुलत भाऊ नीरज कुमार सिंह बबलू यांनी म्हटले की, सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या चौकशीतून रिया वाचू शकत नाही. या एजन्सींनी त्यांचा तपास लवकरात लवकर करुन रियाचा अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुशांतचे वडील आणि बहिणीसोबत चर्चा करताना रामदास आठवले
सुशांतचे वडील आणि बहिणीसोबत चर्चा करताना रामदास आठवले
 • रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतचे वडील के.के. सिंह व बहीण राणी सिंह यांची फरिदाबाद येथे भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी सुशांतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. आठवले म्हणाले, 'मला खात्री आहे की, सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याचे कुटुंब न्याय मागत आहे आणि सध्या सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासावर ते समाधानी आहेत,' असे आठवले यांनी सांगितले.