आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत केसमध्ये विचारपूस:सलग दुस-या दिवशी रियाचा भाऊ शोविकची ईडीकडून चौकशी, काल दोन तास झाली होती प्रश्नोत्तरे; आज सुशांतच्या मित्रालाही बोलावले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी दोन तास शोविकची चौकशी झाली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आत्महत्या प्रकरणाचा ईडी मनी लाँडरिंगच्या कोनातून तपास करत आहे. सुशांतला आत्महत्येस बाध्य केल्याचा व त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साडेआठ तास चौकशी केली. तिच्यासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याचीही ईडीने दोन तास चौकशी केली होती. त्यानंतर आज शोविक पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचला. सलग दुस-या दिवशी ईडीकडून त्याची चौकशी होत आहे. शोविकसह सुशांतचा रुममेट आणि त्याचे सोशल अकाउंट सांभाळणारा सिद्धार्थ पिठानी यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

  • मुंबई पोलिसांकडून सिद्धार्थची यापूर्वी तीनदा चौकशी करण्यात आली आहे.

या लोकांचे जबाब प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत नोंदविण्यात येत आहेत. सुशांतचे सोशल मीडिया अकाउंट हाताळणारा सिद्धार्थ पिठानी सुशांतबरोबर एक वर्षापासून राहात होता. त्यानेच सर्वप्रथम सुशांतचा मृतदेह पाहिला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) मध्ये सिद्धार्थने तीनदा आपला जबाब नोंदवला आहे. सुशांतच्या खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीबाबत ईडीने 31 जुलैला रियाविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. ईडीने रियाकडे तिच्या आणि सुशांतसोबतच्या व्यवहारांची चौकशी केली. गुंतवणूक, करार व संपर्काबाबतही तिला प्रश्न विचारले.

बातम्या आणखी आहेत...