आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध ब्रिटीश गायिका डेमी वेरा मार्गारेट लिन यांचे वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले आहे. दुस-या महायुद्धाच्या वेळी परदेशात अडकलेल्या ब्रिटीश सैनिकांमध्ये डेमी या फोर्सेस स्वीटहार्ट म्हणून लोकप्रिय होत्या. डेमी यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. डेमी वेरा लिन पूर्व ससेक्सच्या डिचलिंगमध्ये वास्तव्याला होत्या. शेवटच्या क्षणी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते.
लिन यांनी युद्धाच्या काळात इजिप्त, भारत आणि बर्मा येथे सैनिकांसाठी कार्यक्रम केले होते. लिन यांनी या कार्यक्रमांचे आयोजन वैयक्तिक जोखमीवर केले होते. त्यांनी युद्धादरम्यान एक लोकप्रिय रेडिओ शोदेखील होस्ट केला होता, ज्याचे शीर्षक होते 'सिंसियरली योर्स'. या शोमध्ये त्यांनी परदेशात असलेल्या ब्रिटिश सैनिकांना संदेश पाठवून रेडिओवर त्यांची आवडती गाणी ऐकवली होती. लिन यांचा हा शो रविवारी रात्रीच्या न्यूज बुलेटिननंतर अर्ध्या तासासाठी प्रसारित व्हायचा.
लिन यांचे वडील प्लंबर होते. तर आई शिवणकाम करायच्या. लिन यांचा जन्म 20 मार्च 1917 रोजी लंडनच्या ब्लू कॉलर ईस्ट हॅम येथे झाला होता. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी सोशल क्लबमध्ये गाणी गायला सुरुवात केली होती. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. वयाच्या 17 व्या वर्षी, त्या एका बँडमध्ये गायिका बनल्या आणि 21 व्या वर्षी जेव्हा युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा त्या एक नामांकित कलाकार झाल्या होत्या.
1989 मध्ये दुसर्या महायुद्धातील सैनिकांच्या विधवांसाठी निवृत्तीवेतन प्रकरण जिंकण्याच्या मोहिमेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. 2010 पर्यंत, लिन यांनी बर्याच मोठ्या चॅरिटी प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.