आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल आला समोर, रियाच्या खात्यात दिसला नाही पैशांचा व्यवहार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करणार असून सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सुशांतच्या मृत्यूला 65 दिवसांहून अधिकचा काळ लोटून गेला असला तरी अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटूंबावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पैशांची हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. मनी लाँडरिंगच्या आरोपानंतर अंमलबजावणी संचालनालय रिया आणि तिच्या कुटुंबियांकडे सतत विचारपूस करत आहे. दरम्यान, सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.

सुशांत-रिया यांच्या खात्यात कोणताही व्यवहार नाही

टाईम्स नाऊच्या अहवालानुसार सुशांतच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी या फॉरेन्सिक ऑडिट अहवालात करण्यात आली आहे. अहवालात रिया आणि सुशांतच्या बँक खात्यात कोणतेही मोठे व्यवहार आढळले नाहीत. सुशांतच्या खात्यातून जे काही पैसे काढले गेले आहेत ते घरगुती खर्च आणि ट्रिपवर खर्च करण्यात आले आहेत.

ईडीने सुशांतच्या वडिलांचा जबाब नोंदवला

दुसरीकडे ईडीने सुशांतचे वडील के.के. सिंह यांचा जबाब नोंदवले आहे. त्यांनी आपल्या जबाबात पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरविषयी आणि त्यांच्या मुलाच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आल्याचे सांगितले. ईडीने याचा पुरावा मागितला आहे. सुशांतची बहीण मीतूचा यापूर्वीच जबाब नोंदविण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. असेही म्हटले जात आहे की, उर्वरित कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाब दिल्लीत घेतले जाऊ शकतात.

ईडीनेही या लोकांची चौकशी केली आहे

ईडीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा फ्लॅट-मेट सिध्दार्थ पिठानी, त्याची मॅनेजर श्रुती मोदी, सॅम्युएल मिरांडा यांच्यासह 10 हून अधिक जणांनी चौकशी केली आहे. यात सुशांतच्या घरी काम करणार्‍या काही लोकांचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...