आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिशा सालियान मृत्यू प्रकरण:फॉरेन्सिक अहवालात दावा - दिशाच्या शरीरावर दुखापतीच्या दोन खुणा होत्या, एक जखम इमारतीवरून पडण्यापूर्वीची होती

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया आणि संदीपची सीबीआयने चौकशी करावी - एक्सपर्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला एक नवीन वळण आले आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात दिशा मृत्यू प्रकरणाचीही चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, दिशाच्या शरीरावरच्या दोन जखमा होत्या. त्यापैकी एक जखम ही इमारतीतून पडण्यापूर्वी म्हणजे मृत्यूआधीची होती.

दिशाने 8 जून रोजी मालाडमधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या मुंबईच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

  • रिया आणि संदीपची सीबीआयने चौकशी करावी - एक्सपर्ट

रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, दिशाच्या फॉरेन्सिक अहवालात दोन जखमांचा उल्लेख आहे. त्यामुळे तिची हत्या झाल्याची शक्यता आहे. रिपब्लिक टीव्हीने फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. दिनेश राव यांच्याशी बातचीत केली. राव यांनी या जखमांबद्दल सांगताना म्हटले केली, सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा स्वयंघोषित मित्र व निर्माता संदीप सिंग याची चौकशी करावी.

  • दुखापत होण्याची ही शक्यता आहे

अहवालानुसार, जेव्हा ती उंचावरून खाली जमिनीवर पडली तेव्हा तिला एक दुखापत झाली. तर एक दुखापत तिला इमारतीवरून पडण्याआधीच झाली होती. डॉ. राव यांनी यासंदर्भात चौकशीचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, चौकशीतूनच दिशाची हत्या झाली की नाही हे समोर येऊ शकेल. तिचा छळ झाला असावा किंवा तिला मारहाण झाली असावी आणि तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असावा. आणि त्यातूनच तिला ही दुखापत झाली असावी. याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...