आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोपिकची घोषणा:सौरव गांगुलीच्या आयुष्यावर येतोय चित्रपट, बायोपिकमध्ये रणबीर कपूर साकारु शकतो भूमिका, 'प्यार का पंचनामा' फेम लव रंजन करणार दिग्दर्शन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लव फिल्म्सने केली क्रिकेट लिजेंड सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकची घोषणा!

आज लव फिल्म्सने भारतीय क्रिकेट लिजेंड सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे सौरव गांगुली ज्यांना दादा म्हणून ओळखले जाते, जे निर्विवादपणे भारतातील सर्वात यशस्वी आणि विवादास्पद क्रिकेट कॅप्टन्सपैकी एक राहिले आहेत. क्रिकेटसाठी धडधडणाऱ्या सर्व भारतीयांच्या हृदयात त्यांच्यासाठी एक खास जागा निश्चितच आहे.

90च्या दशकातील क्रिकेटर ते सध्याच्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होण्यापर्यंत, गांगुली यांना अंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्ससोबत त्यांचा अनेक विवादास्पद भूमिकेसाठी देखील तितकेच ओळखले जाते. त्यांचे जीवन भारतीय क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक नाट्य असून ते मोठ्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी तितकेच रोचक असेल. या बायोपिकची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत.

'प्यार का पंचनामा'सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे लव रंजन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. या बायोपिकमध्ये गांगुली यांची भूमिका कोण साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एका मुलाखतीत गांगुली यांनी रणबीर कपूरला पहिली पसंती दर्शवली होती.

सौरव गांगुली यांच्या बायोपिकचे बजेट 250 कोटी रुपये असेल
महिन्याभरापूर्वी सौरव यांच्या बायोपिकची स्क्रिप्ट लिहिली जात असल्याची बातमी आली होती. निर्माते सध्या चित्रपटात ठळपणे दाखवल्या जाणा-या सौरव गांगुली यांच्या आयुष्यातील त्या खास घटनांविषयी चर्चा करत आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असेल.

मुंबई-कोलकातामधील प्रॉडक्शन हाऊसने बायोपिकमध्ये रस दाखवला होता
सौरव यांची पत्नी डोना गांगुली यांनी एका मुलाखतीत या बायोपिकबद्दल सांगितले होते. यावेळी डोना यांनी सांगितले होते, "मुंबई आणि कोलकाता मधील अनेक प्रॉडक्शन हाऊसनी बायोपिकविषयी उत्सुकता दाखवली आहे आणि सौरव प्रत्येक पर्यायावर विचार करत आहेत. बायोपिक अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण बायोपिक नक्कीच बनवला जाईल याची खात्री आहे."

क्रिकेटपटूवर बायोपिक बनवण्याची ही पहिली वेळ नाही. गांगुली यांच्या आधी मोहम्मद अझहरुद्दीन आणि महेंद्रसिंग धोनीवरही चित्रपट बनला आहे. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर एक माहितीपटही बनवण्यात आला. याशिवाय मेरी कोम आणि सायना नेहवाल यांच्यासह अनेक खेळाडूंवर चित्रपट बनले आहेत.

लव फिल्म्सने 'सोनू के टीटू की स्वीटी', 'दे दे प्यार दे', 'मलंग' आणि 'छलांग' सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनणा-या 'कुत्ते' आणि 'उफ्फ' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...