आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतने नव्हे अंकिताने भरला फ्लॅटचा हप्ता:सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणाली- स्वतः भरतेय फ्लॅटचा EMI, सुशांतच्या बँक खात्यातून हप्ता भरल्याची बातमी खोटी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
  • अंकिता आणि सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघे 2016 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ईडी देखील चौकशी करत आहे. ईडीने या तपासणीविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. पण, काही माध्यमांनी दावा केला आहे की, सुशांत त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या फ्लॅटचा हप्ता भरत होता. आता अंकिताने या वृत्ताचे खंडन केले आहे. अंकिताने फ्लॅटची कागदपत्रे समोर आणून आरोप करणा-यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

अंकिताने सोशल मीडियावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा ईएमआय अंकिता स्वतः भरत असल्याचे दिसत आहे. घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिताच्या खात्याची माहिती आहे. तिने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणा-यांचे तोंड बंद केले आहे. अंकिताने सांगितल्यानुसार, हा फ्लॅट तिने 1.35 कोटी रुपयांत खरेदी केला होता. आणि ती स्वतः त्याचे हप्ते भरत आहेत. 2010 मध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांच्यात जवळीक वाढली होती. सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. रिलेशनशिपमध्ये असताना हे दोघे लिव्ह इनमध्ये होते आणि या फ्लॅटमध्ये राहात होते. आता यावर अंकिताने स्पष्टीकरण दिले आहे.

अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केली फ्लॅटची कागदपत्रे

अंकिताने तिच्या फ्लॅटची कागदपत्रे आणि दर महिन्याला भरत असलेल्या ईएमआयची माहिती दिली आहे. अंकिताच्या म्हणण्यानुसार, ती स्वत: या फ्लॅटचा हप्ता भरत आहे. हा फ्लॅट तिने 1.35 कोटी रुपयांत खरेदी केला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये सध्या या फ्लॅटचे बाजार मूल्य सुमारे साडेचार कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

अंकिताने ट्विटमध्ये म्हटले आहे- ‘माझ्यावर होत असलेल्या आरोपाचे मी खंडन करतेय. यापेक्षा आधिक पारदर्शक होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची कागदपत्रे आणि जानेवारी 2019 ते 1 मार्च 2020 पर्यंतचा माझ्या बँक खात्याचा तपशील येथे देत आहे. माझ्या अकाउंटमधऊन दर महिन्याला ईएमआय भरला जातोय. यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही.’

  • सुशांतच्या कुटुंबीयांचा अंकिताला पाठिंबा

अंकिताच्या या पोस्टवर सुशांत राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने कमेंट केली आहे. श्वेता सिंह म्हणते, ‘तू स्वतंत्र मुलगी असल्याचे मला माहित आहे. याचा गर्व आहे.’ यावर अंकिताने लिहिले, 'धन्यवाद ताई.'

  • 4 वर्षांपासून सुशांतच्या संपर्कात नव्हती अंकिता

2010 मध्ये अंकिता आणि सुशांतची भेट 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर झाली होती. याचकाळात दोघांमध्ये सूत जुळले. 6 वर्षानंतर म्हणजेच 2016 मध्ये हे दोघे वेगळे झाले. अंकिताने एका मुलाखतीत सांगितले होते की - सुशांतशी 2016 पासून मी संपर्कात नव्हते. माझ्याकडे त्याचा नंबरही नव्हता. अंकिताच्या म्हणण्यानुसार, रिया सुशांतच्या आयुष्यात कधी आली हेही तिला माहिती नव्हते. पण हे दोघे एक वर्षासाठी एकत्र होते आणि याकाळात सुशांत कुटुंबापासून दूर होता. ती म्हणाली होती- 'सुशांत त्याच्या आयुष्यात आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी होते'.

बातम्या आणखी आहेत...