आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपील:स्वराज कौशल अमिताभ बच्चन यांना म्हणाले - ''तुम्ही त्यांच्यात वरिष्ठ आहात, कृपया काहीतरी करा 'बॉलिवूड' आता 'गालिवूड' झाले आहे''

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वराज कौशल यांनी अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ अभिनेते म्हणून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

कामाचा अभाव, आर्थिक अडचणी, आत्महत्या, आरोप-प्रत्यारोप, नेपोटिज्म, गुंडेगिरी आणि कास्टिंग काउच .. बॉलिवूडमध्ये लॉकडाऊनपासून खळबळ उडाली आहे, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ही परिस्थिती बघून मिझोरमचे माजी राज्यपाल आणि सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी बॉलिवूडचा 'गालिवूड' असा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटसृष्टीच्या सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ अभिनेते म्हणून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. स्वराज कौशल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याविषयी लिहिले आहे.

स्वराज कौशल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ''बॉलिवूड गालिवूड बनला आहे. आपण कोठे जात आहोत?'', असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांना उद्देशून लिहिले, ''अमिताभ जी तुम्ही या सर्वांमध्ये मोठे आहात. कृपया येथील परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करा, काय म्हणू... दररोज तमाशा माझ्यासमोर होतोय..'', असे ट्विट त्यांनी केले आहे.   

  • अमिताभ बच्चन प्रतिक्रिया देत नाहीत

स्वराज कौशल यांच्या या आवाहनानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेची वाट बघितली जात आहे. सहसा बिग बी बॉलिवूडच्या कोणत्याही वादावर प्रतिक्रिया देत नाहीत. परंतु, सुशांतच्या मृत्यूवर त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आत्महत्येविषयी प्रश्न केला होता.

बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा घटनाक्रम 

  • कलाकारांची आत्महत्या

प्रेक्षा मेहता, मनप्रीत ग्रेवाल, सुशांतसिंग राजपूत यांनी आयुष्य संपवले. काम नसल्यामुळे प्रेक्षा नैराश्यात आली होता, तर मनप्रीतने आर्थिक अडचणीमुळे मृत्यूला कवटाळले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अनेक कारणे एकत्र आली, नेपोटिज्ममुळे होणारी उपेक्षा, हातून चित्रपट जाणे,  प्रेमसंबंधातील अपयश आणि एकाकीपणा यांचा समावेश आहे. 

  • आरोप-प्रत्यारोप 

गायक सोनू निगमने संगीत क्षेत्रातही घराणेशाही असल्याचे सांगून टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर कास्टिंग काऊचचाही आरोप लावला आहे. भूषण कुमार यांची पत्नी दिव्या कुमार खोसला यांनी सोनूवर प्रत्योरोपांच्या फेरी झाडल्या आहेत. 

  • स्टार किड्स आणि नेपोटिज्म

सोनम कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, अनन्या पांडे यासारख्या कलाकारांसोबत काम करणारा करण जोहरला सर्वाधिक लक्ष्य केले गेले आहे. सोशल मीडियावर सतत त्याला ट्रोल केले जात आहे. या कलाकारांची दिवसेंदिवस फॉलोअर्सची संख्या कमी होत  आहे. सलमान खानवरदेखील बॉलिवूडमध्ये  घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. 

बातम्या आणखी आहेत...