आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'KBC 12' च्या चौथ्या करोडपती नेहा शाह म्हणाल्या - 'मला जिंकलेल्या रकमेतून लाइफ सपोर्ट सिस्टम खरेदी करायची आहे जेणेकरुन गरिबांची मदत करता येईल'

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहा शाह या एक डॉक्टर आहेत.

मुंबईच्या डॉ. नेहा शाह 'कौन बनेगा करोडपती 12' च्या चौथ्या करोडपती ठरल्या आहेत. नेहा व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांना जिंकलेल्या पैशातून काही उपकरणे खरेदी करायची आहेत जेणेकरुन त्या आजारी लोकांना मदत करु शकतील. अलीकडेच दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणा दरम्यान नेहा यांनी या कार्यक्रमाशी संबंधित काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.

डॉ. नेहा म्हणाल्या, "मागील 20 वर्षांपासून मी या शोमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले. मात्र यावेळीदेखील प्रवास सोपा नव्हता. कार्यक्रमात अंतिम निवड होण्यापूर्वी मला दोनदा स्टँडबाय ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी निराश झाले होते. परंतु या संघर्षाचा जो शेवट झाला त्यामुळे मी खूप आनंदी आहे. स्क्रिनवर स्वतःला पाहिल्यावर मला समाधान वाटले.'

शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट-सीटवर बसण्याच्या अनुभवाबद्दल नेहा म्हणाल्या, "खरे सांगायचे तर एवढी मोठी रक्कम जिंकून आनंद झाला, पण अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून जेवढा आनंद झाला, तो शब्दांत वर्णन करता येत नाहीये. बच्चन सर तुम्हाला एवढे कम्फर्टेबल करतात की तुम्ही कितीही घाबरलेले असला तरी तुमची भीती निघून जाते. माझ्या या विजयाचे श्रेय मी त्यांनाही देऊ इच्छिते. कारण त्यांनी संपूर्ण खेळादरम्यान मला प्रोत्साहन दिले."

या शोमध्ये नेहा यांनी एक कोटीची रक्कम जिंकली आहे. या पैशांतून त्यांना स्वतःचे क्लिनिक सुरु करायचे आहे. परंतु त्यासाठी त्यांना आणखी पैशांची गरज आहे. त्याबद्दल त्या म्हणतात, "मला स्वतःचे क्लिनिक उघडण्याची इच्छा आहे, परंतु खरं सांगायचं तर माझं स्वप्न इतक्या पैशात पूर्ण होणार नाही. मी ठरवलं आहे की, या पैशातून मी लाइफ सपोर्ट सिस्टम खरेदी करणार. कोविडच्या काळात मला समजले की, जर आमच्याकडे आणखी ऑक्सिजन मशीन असत्या तर आम्ही आणखी बर्‍याच गरीब लोकांना मदत करू शकलो असतो. मी त्याबरोबरच एक ईसीजी मशीन खरेदी करण्याचा विचारही करत आहे. एकूणच मी हा पैसा फक्त माझ्या प्रोफेशनमध्ये पुढे जाण्यासाठी वापरणार आहे, जेणेकरून गरीब लोकांना मदत करण्यास मी सक्षम होईल."

नेहा आणि त्यांच्या वडिलांनी एक दिवसही आपले क्लिनिक कधीच बंद केलेले नाही. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार केले आणि आजही त्यांचे हे कार्य सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...