आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौजन्या आत्महत्या प्रकरण:कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्याच्या खोलीतून मिळाली चार पानांची सुसाईड नोट, मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॅटूच्या खुणामुळे पटली ओळख

कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्या शुक्रवारी बेंगळुरू येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. सौजन्याने आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली होती. मागील काही दिवसांपासून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे या सुसाईड नोटवरुन स्पष्ट झाले आहे. मी आता टेन्शन घेऊ शकत नाही, असे तिने या चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, परंतु या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पप्पा, मम्मी मला माफ करा
सौजन्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले, 'हे पाऊल उचलल्याबद्दल मला खूप खेद वाटतोय. पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. जसे मी तुम्हाला सांगितले होते की, मी आता हे सहन करू शकत नाही. खूप कठीण होत आहे अप्पा. सॉरी आई, मी म्हटल्याप्रमाणे मी आज येईन पण, मला माहित नव्हते की मी या मार्गाने येईन. मला माफ कर आई, मला याबद्दल खूप खेद वाटतोय. पप्पा कृपया आजीची काळजी घ्या.'

तिने पुढे लिहिले, "मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. माझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. हेल्थ इश्यू मला आतून मारत आहेत. म्हणून मला हे पाऊल उचलणे योग्य वाटत आहे. तुम्ही लोक मला माफ कराल. पप्पा, मम्मी मला माफ करा ... प्रत्येक गोष्टीसाठी आय लव्ह यू."

टॅटूच्या खुणामुळे पटली ओळख
रामनगरचे एसपी गिरीश यांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांना या घटनेची माहिती मिळाली. ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुसाइट नोट जप्त केली. सौजन्या मागील दीड वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये एकटी राहात होती. प्रथमदर्शनी पोलिसांना हे आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे, मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नक्की प्रकरण काय आहे, हे समजू शकेल. सौजन्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतून बाहेर काढला. सौजन्याने साडीचा वापर करत गळफास घेतला. तिच्या पायावरील टॅटूच्या खुणामुळे तिची ओळख पटली.

जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती
सौजन्या कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने टीव्हीबरोबरच साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ही बातमी कन्नड इंडस्ट्रीसाठी धक्कादायक आहे, कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आरोग्य आणि संघर्षामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. वर्षाच्या सुरुवातीला 'बिग बॉस कन्नड' फेम अभिनेत्री चैत्र कुटूर हिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...