आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसोडे में कौन था... रॅप साँग बनवणारा कोण आहे?:चार वर्षांपूर्वी औरंगाबादचा तरुण इंडियन आयडॉल ऑडिशनमध्ये झाला होता रिजेक्ट, आज त्याचेच नाव आहे प्रत्येकाच्या ओठी

शब्दांकन - विकास वर्मा3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
यशराजने सांगितल्यानुसार, 'रसोडे में कौन था...' या रॅप साँगने त्याचे आयुष्य बदलून गेले. एका आठवड्यात त्याचे इंस्टाग्रामवर सात लाख फॉलोअर तर यूट्यूबवर 1 मिलियन सब्सक्राइबर झाले आहेत.
 • 24 वर्षीय संगीतकार यशराज मुखातेचा हा व्हायरल व्हिडिओ सर्व सेलिब्रेटी शेअर करत आहेत.
 • यशराज म्हणतो- जेव्हा कोकिलाबेनचा फोन आला, तेव्हा त्यांनी रागवण्यासाठीच कॉल केला, असे मला वाटले होते
 • संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांनी जर व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिली तरी माझे संगीत बनवणे सार्थकी ठरेल, असे यशराज म्हणतो.

सध्या सोशल मीडियावर एक एंटरटेनिंग व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, जो एखाद्याला हसवण्यासाठी किंवा एखाद्याची चेष्ठा करण्यासाठी खूप शेअर केला जातोय. सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी, प्रत्येकजण हा व्हिडिओ शेअर करत आहे. हा व्हिडिओ आहे 'रसोडे में कौन था...' 24 वर्षीय संगीतकार यशराज मुखाते याने चक्क मालिकेतीन संभाषणावर एक रॅप साँगच तयार केले आहे. या विनोदी गाण्याचा गंमतीशीर व्हिडिओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा एक नवा जॉनर आहे. संगीताच्या संगीताच्या भाषेत, अशा व्हिडिओंना डायलॉग्स विथ बीट्स किंवा रॅप व्हिडिओ असे म्हणतात. हा व्हायरल व्हिडिओ मुळचा औरंगाबादच्या असलेल्या यशराज मुखातेने संगीतबद्ध केला आहे. या व्हिडिओमुळे यशराज आता सोशल मीडिया स्टार बनला आहे. व्हायरल व्हिडिओच्या क्रिएशनपासून ते आपल्या आयुष्याविषयी यशराजने दिव्य मराठीसोबत खास बातचीत केली.

यशराजने तयार केलेले हे गाणे ‘साथिया साथ निभाना’ या मालिकेतील एका सीनवर आधारित आहे. ‘साथिया साथ निभाना’ ही स्टार प्लस वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका होती. याच मालिकेतील संवादावर यशराजने तयार केलेले हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
यशराजने तयार केलेले हे गाणे ‘साथिया साथ निभाना’ या मालिकेतील एका सीनवर आधारित आहे. ‘साथिया साथ निभाना’ ही स्टार प्लस वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका होती. याच मालिकेतील संवादावर यशराजने तयार केलेले हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यशराज सांगतो की, 'रसोडें में कौन था...' या एका डायलॉगने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. 20 ऑगस्टच्या संध्याकाली त्याने जेव्हा हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्याचे इंस्टाग्रामवर 25 हजार फॉलोअर होते आता आठवड्याभरात त्याच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल सात लाखांहून अधिक झाली आहे. तर यूट्यूबचे सबस्क्राइबर 10 हजारांहून वाढून आता 10 लाखांहून अधिक झाले आहेत.

 • कटेंटवर जेव्हा मीम्स बनू लागले तेव्हा समजले की ते खरोखरच व्हायरल झाले आहे

यशराज सांगतो की, जेव्हा रसोडे में कौन था... हे रँप तयार करत होते, तेव्हा ते एवढे व्हायरल होईल, असे वाटले नव्हते. एक दिवस फेसबुकवर स्क्रोल करताना मी हा व्हिडिओ पाहिला. या संवादात स्वर आणि लय असल्याचे मला जाणवले. यामुळे मला प्रेरणा मिळाली, आणि त्यानंतर मी हे रॅप तयार केले.

यशराजने सांगितले की, माझ्या मित्रांना हा व्हिडिओ तेवढा खास वाटला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना माझे काम माहित आहे आणि ते पुर्वीपासून ते ऐकत आले आहेत. परंतु, मला असे वाटते की लोक या पात्रांशी खूप जुळले आहेत, म्हणून लोक याला रिलेट करु शकले. यशराज म्हणतो की, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यापर्यंत अनेकांनी तो शेअर केला. पण जेव्हा यावर मीम्स बनू लागले तेव्हा तो ख-या अर्थाने व्हायरल झाला, हे माझ्या लक्षात आले. कारण एखाद्या कंटेंटवर मीम्स बनले तर समजावे की, तो कंटेंट तरुणांपर्यंत पोहोचला आणि ख-या अर्थाने व्हायरल झाला आहे.

20 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत यशराजचे इंस्टाग्रामवर 25 हजार फॉलोअर होते आता आठवड्याभरात त्याच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल सात लाखांहून अधिक झाली आहे.
20 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत यशराजचे इंस्टाग्रामवर 25 हजार फॉलोअर होते आता आठवड्याभरात त्याच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल सात लाखांहून अधिक झाली आहे.
 • जेव्हा मला कोकिलाबेनचा फोन आला तेव्हा मला वाटले की त्या रागवणार आहेत

यशराज म्हणतो की “या व्हिडिओनंतर मला कोकिलाबेनची भूमिका साकारणा-या अभिनेत्री रुपल यांचा फोन आला होता. जेव्हा त्यांनी फोन करुन कोकिलाबेन बोलतेय असे सांगितले, तेव्हा क्षणभर त्या मला रागावतील असे वाटले होते. पण त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाला की, तू अगदी योग्य पद्धतीने माझे डिक्शन पकडले आहे. यशराजने सांगितले की, मी लहानपणापासूनच अनुराग कश्यपचा चाहता आहे. त्यांनी माझे काम पाहून मला मेसेज केला आणि स्टुडिओत कधीतरी भेटायला ये, एकत्र मिळून काही तरी करुयात असे म्हटले. ही माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोटिवेशनल कमेंट होती.

बॉलिवूड संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदीसोबत यशराज
बॉलिवूड संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदीसोबत यशराज
 • मी अमित त्रिवेदींंना देव मानतो, त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे

यशराज सांगतो, “मी बॉलिवूड संगीत दिग्दर्शक आणि गायक अमित त्रिवेदी यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे. मी त्यांना माझा देव मानतो, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. जर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला किंवा त्यावर एखादी प्रतिक्रिया जरी दिली, तरी माझे संगीत बनवणे सार्थकी ठरेल.”

यशराज 2016 मध्ये इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये सहभागी झाला होता, पण पहिल्याच राऊंडमध्ये त्याला बाहेर पडावे लागले होते.
यशराज 2016 मध्ये इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये सहभागी झाला होता, पण पहिल्याच राऊंडमध्ये त्याला बाहेर पडावे लागले होते.
 • इंडियन आयडॉलच्या ऑडिशनमध्ये गाण्याचा पहिला शब्द ऐकताच मला रिजेक्ट केले होते

यशराजने सांगितले, “मी 2016 मध्ये माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून इंडियन आयडॉल या सांगितिक कार्यक्रमात ऑडिशन द्यायला गेलो होतो. तेथे स्टुडिओ राऊंडच्या आधीही तीन राऊंड असतात. त्याच्या फर्स्ट राऊंडमध्येच मी बाहेर झालो होतो. तेथे प्रॉडक्शन हाऊसचे टीम मेंबर्स, 10 लोकांना एकत्र उभे करुन गायला सांगतात. माझा नंबर आला की मी 'रॉय' चित्रपटातील 'तू है की नहीं' गायला सुरुवात केली.

मी 'तुझसे ही…' हा गाण्याचा पहिला शब्द गायला आणि टीमने मला बाहेर जाण्यास सांगितले, त्यांनी माझा पूर्ण आवाजदेखील ऐकला नव्हता. मला त्यांनी पुढच्या वेळी प्रयत्न करायला सांगितले. माझ्यासोबत काय घडले, ते मला समजू शकले नाही. कारण याच गाण्यावर यापूर्वी मी बर्‍याच स्पर्धा जिंकल्या होत्या. या ऑडिशननंतर मला वाटले की, मी गाण्यावर नव्हे तर माझ्या उर्वरित कौशल्यावर लक्ष केंद्रित करायले हवे. पण नंतर मी माझी गाणी तयार केली तेव्हा लोकांना माझा आवाजही खूप आवडला.”

यशराजचे वडील संगीतकार तर आईचा गारमेंटचा बिझनेस आहे. त्याला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. त्याची बहीण आर्किटेक्ट आहे.
यशराजचे वडील संगीतकार तर आईचा गारमेंटचा बिझनेस आहे. त्याला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. त्याची बहीण आर्किटेक्ट आहे.
 • आईच्या सांगण्यावरून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएश पूर्ण केले

यशराजने 2010 मध्ये औरंगाबादच्या होली क्रॉस स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर औरंगाबाद येथीलच एमआयटी कॉलेजमधून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. दरम्यान संगीताची आवड तो जोपासतच होता.

यशराजने सांगितल्यानुसार, त्याला इंजिनिअरिंमध्ये काही विशेष रस नव्हता, पण करिअरच्या सुरक्षेच्या दृष्टीने एखादी पदवी हवी, असे आईचे मत होते. म्हणून इच्छा नसूनदेखील पदवीचे शिक्षण घेतले. 2017 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करुन त्याने संगीताकडे आपले लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला तो लोकांनी गायलेल्या गाण्यांचे कव्हर्स बनवत असत. हळूहळू, इंटरनेटवरील त्याचे काम बघून लोकांनी त्याला अप्रोच करायला सुरुवात केली. यशराजने आपला पहिला पिआनो कव्हर 'वेक मी अप ...' या इंग्रजी गाण्याचा बनवला होता. हा यूट्यूबवरील त्याचा पहिला व्हिडिओ होता. त्यानंतर त्याने मोहब्बत गाण्याचे पिआनो कव्हर केले. मग तो स्वतःचा कव्हर साँग गाऊ लागला. यशराजने गायलेले पहिले कव्हर साँग चन्ना मेरेया हे आहे.

यशराजने सांगितले की, अभियांत्रिकीनंतर संगीतात करिअर करण्यासाठी तो मुंबईला आला होता, पण दोन महिन्यांतच त्याला औरंगाबादला परत जावे लागले. यानंतर, त्याच्या वडिलांनी सुमारे 9 लाख रुपये खर्च करून घराच्या पार्किंग क्षेत्रात एक संगीत स्टुडिओ बनवून दिला.

संगीतकार सलीम मर्चेंटसोबत यशराज. सलीम यांनीही यशराजच्या कामाचे कौतुक केले आहे.
संगीतकार सलीम मर्चेंटसोबत यशराज. सलीम यांनीही यशराजच्या कामाचे कौतुक केले आहे.
 • मौला मेरे… गाण्याचे ऍकापेला व्हर्जन सलीम मर्चेंट यांनी शेअर केले

यशराज सांगतो, "2018 मध्ये मी 'मौला मेरे ले ले मेरी जान...' या गाण्याचे ऍकापेला व्हर्जन बनवून ते अपलोड केले होते. ऍकापेला म्हणजे एक गाणे ज्यामध्ये कोणतेही संगीत वाद्य वापरले जात नाही, संपूर्ण संगीत तोंडाने किंवा टाळ्या वाजवून तयार केले जाते. हे गाणे बॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक सलीम मर्चेंट यांनी सोशल मीडियावर पाहिले आणि आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

यानंतर मी त्यांना मेसेज केला आणि विचारले की मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या स्टुडिओमध्ये येऊ शकतो का? ते हो म्हणाले आणि मी मुंबईला गेलो. तेथे त्यांनी मला संपूर्ण स्टुडिओ दाखवला, मी तिथले सर्व टेक्निकल पॉइंट्स पाहिले. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला असिस्टंट हवा असल्यास मी करू शकतो. ते म्हणाले की तू स्वत: उत्तम गाणी तयार करू शकता, यामुळे मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर आतापर्यंत मी माझी स्वतःची सहा गाणी केली आहेत."

यशराजने 2010 मध्ये औरंगाबादच्या होली क्रॉस स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर औरंगाबाद येथीलच एमआयटी कॉलेजमधून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले.
यशराजने 2010 मध्ये औरंगाबादच्या होली क्रॉस स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर औरंगाबाद येथीलच एमआयटी कॉलेजमधून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले.
 • संगीत माझ्या जीन्समध्ये आहे, वडीलदेखील आहेत संगीतकार

यशराजने सांगितल्यानुसार, संगीत त्याच्या जीन्समध्ये आहे, त्याचे वडील देखील संगीतकार आहेत, संगीताचे धडे त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाले आहेत, आणि सोबतच इंटरनेटची मदतही तो घेतो. वयाच्या तिस-या वर्षी त्याने पहिला स्टेज शो आपल्या वडिलांसोबत केला होता. शाळा-महाविद्यालयातही यशराजने संगीतात अनेक पुरस्कार आपल्या नावी केले.

यशराजने सांगितल्यानुसार, तो आता फ्रिलान्सिंग संगीत तयार करतो आणि जाहिराती, जिंगल्स, व्हॉईस ओव्हर्स आणि गाणी बनवतो. यशराजचे वडील संगीतकार तसेच प्रॉपर्टी डिलर आहेत. त्याच्या आईचा कपड्यांचा व्यवसाय आहे. त्याला एक बहीण असून ती आर्किटेक्ट आहे. तिचे लग्न झाले आहे.