आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, सीबीआय आपला होमवर्क पूर्ण करुन रियाची चौकशी सुरु करेल. जर रियाने तपासात सीबीआयला सहकार्य केले नाही तर मात्र तिला अटक केली जाऊ शकते.
सीबीआय रियाला या 10 मुद्द्यांवर प्रश्नोत्तरे करु शकते -
सिद्धार्थ पिठानीची सलग तिस-या दिवशी चौकशी
दुसरीकडे, सीबीआयच्या टीमने सोमवारी वॉटरस्टोन रिसॉर्टमधील स्टाफचा जबाब नोंदवला. आणि काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. सुशांत डिप्रेशनच्या काळात या रिसॉर्टमध्ये थांबला होता. सुशांतच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी सीबीआयची एक टीम ईडीच्या संपर्कात आहे. सीबीआयची दुसरी टीम डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सिद्धार्थचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. सुशांतचा सीए रजत मेवाती यांचीही चौकशी केली गेली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 14 जून दरम्यान काय - काय घडले याचा सीबीआय तपास करत आहेत. विशेषत: रियाशी झालेल्या अखेरच्या भेटीनंतर सुशांतची मानसिक स्थिती कशी होती हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिया निघून गेल्यानंतर सुशांत कुणाशी बोलला आणि 12 जूनपर्यंत आपल्या बहिणीसोबत असताना त्याचे वर्तन कसे होते हे देखील सीबीआयला शोधायचे आहे.
सीबीआयची टीम रविवारी सलग दुसर्या दिवशी सुशांतच्या फ्लॅटवर गेली होती आणि 14 जूनच्या घटनेचे रिक्रिएशन केले होते. सीबीआय तिथे 2 तास थांबली. सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह आणि हाऊस हेल्पर दीपेश सावंत यांनाही तपास यंत्रणेने सोबत नेले होते. त्यापूर्वी तिघांनाही स्वतंत्रपणे आणि नंतर एकत्र बसवून प्रश्नोत्तरे केली गेली. त्यांच्या वक्तव्यातील फरकामुळे सीबीआयने त्यांना सुशांतच्या फ्लॅटवर सोबत नेले होते.
सुशांतच्या फ्लॅट मालकाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते
रविवारी सुशांतच्या फ्लॅटचे मालक संजय लालवानी यांची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. त्यांच्याकडे भाडे कराराच्या प्रतसह आणखी काही माहिती मागितली आहे. म्हणून, आज त्यांची पुन्हा चौकशी होऊ शकतो. वांद्रेस्थित माँट ब्लँक अपार्टमेंटच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील 4 फ्लॅट्स सुशांतने 3 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतले होते. त्याचे मासिक भाडे 4.50 लाख रुपये होते. दरवर्षी भाडे 10% वाढवण्याचा करार होता. 9 डिसेंबर 2019 रोजी पासून ते 2022 पर्यंतच्या कालावधीपर्यंत हा डुप्लेक्स फ्लॅट भाडे तत्वावर घेण्यात आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.