आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुप्रतीक्षित चित्रपट:फॉक्स स्टारने दिग्दर्शक अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’चा कालावधी कमी करण्याचे सांगितले, तीन तास नव्हे आता अडीच तास असेल कालावधी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणत्या न कोणत्या कारणाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होत होता.

इंडस्ट्री आणि प्रेक्षक गेल्या एक वर्षापासून रणबीर कपूर आणि आलिया भट्‌ट अभिनीत 'ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाची शूटिंग गेल्या दोन वर्षापासून सुरू होती. कोणत्या न कोणत्या कारणाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होत होता.

आता चित्रपटाचा काही भाग बनून तयार आहे. तो भाग दिग्दर्शक अयान मुखर्जीने निर्माते करण जोहर आणि फॉक्स स्टार स्टुडिओला दाखवला आहे. यादरम्यान फाॅक्स स्टार स्टुडिओने त्यांना चित्रपटाचा कालावधी कमी करण्याची विनंती केली आहे. कालावधी तीन तासांपेक्षा कमी करून अडीच तास बनवला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटाचा एक शेड्यूल नोव्हेंबरमध्ये शूट होणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयसह अनेक मोठे कलाकार आहेत.

हा चित्रपट यापूर्वी 4 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाची पार्श्वभूमी बघता रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.