आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता वादात:करणवीर बोहराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, महिलेने पैसे परत मागितल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणवीर बोहरावर फसवणुकीचे आरोप

लोकप्रिय टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा वादात सापडला आहे. एका 40 वर्षीय महिलेने करण आणि इतर 5 जणांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण रक्कम 2.5% व्याजाने परत करण्याचे आश्वासन देऊन अभिनेत्याने 1.99 कोटी रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.

करणवीर बोहरावर फसवणुकीचे आरोप
ओशिवारा पोलिसांनी सांगितले की, 49 वर्षीय महिलेने मनोज बोहरा उर्फ करणवीर बोहरा याच्यासह सहाजणांवर 1 कोटी 99 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दावा केला की अभिनेत्याने तिला संपूर्ण रक्कम 2.5 टक्के व्याजाने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 1 कोटीची रक्कम परत केली आहे.

महिलेला गोळ्या घालण्याची दिली धमकी
"महिलेने जेव्हा करणवीरकडे आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा करणवीर आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी तिला योग्य प्रतिसाद दिला नाही? आणि तिला गोळ्या घालण्याची धमकी दिली.," असे महिलेने आपल्या जबाबात नोंदवले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, लवकरच करणवीर आणि त्याच्या पत्नीचाही जबाब नोंदवला जाईल.

'लॉकअप'मध्ये त्याच्या कर्जाबद्दल व्यक्त झाला होता
करणवीर शेवटचा कंगना रनोटचा रिअ‍ॅलिटी शो 'लॉकअप'मध्ये दिसला होता. शोमध्ये त्याने त्याच्या कर्जाबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितल्यानुसार, गेल्या 7 वर्षांपासून त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले आहेत. याकाळात तो कर्जबाजारी झाला आणि पैसे परत न केल्यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. शोमधून बाहेर आल्यानंतर करणवीर म्हणाला होता की, "मी या शोमधून इतके कमावले आहे की माझ्यावरील सर्व कर्ज फेडले जातील."

बातम्या आणखी आहेत...