आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल गॉसिप:अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करतेय अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी जावेद जाफरी यांच्या मुलासोबत जोडले गेले होते नाव

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव 'बंटी बबली 2' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडले गेले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सिद्धांत नव्या नवेलीला डेट करत आहे. एवढेच नाही तर दोघेही त्यांच्या नात्याविषयी गंभीर आहेत. अद्याप या अफवांना पुष्टी मिळाली नाही.

जावेद जाफरी यांच्या मुलासोबत जोडले गेले होते नाव
नव्या नंदा हिचे नाव यापूर्वी अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरीसोबत जोडले गेले होते. मीजानची बहीण अलविया हिच्या माध्यमातून नव्याची त्याच्याशी ओळख झाली होती. मीजानने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये, नव्या त्याची केवळ एक चांगली मैत्रीण असल्याचे सांगत डेटिंगच्या अफवांचे खंडन केले होते. दुसरीकडे, नव्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले नाही.

नव्या आणि सिद्धांतच्या कनेक्शनच्या बातम्या कितपत खऱ्या आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यांनी कधीही एकत्र फोटो काढले नाहीत आणि ते कधीही एकत्र दिसले नाहीत. नव्या आणि सिद्धांत दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवण्यासाठी ओळखले जातात.

महिलांच्या हितासाठी काम करत आहे नव्या
नव्याचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत आणि ती अधूनमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. नव्याने तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याऐवजी फॅमिली बिझनेसमध्ये एंट्री घेतली आहे. आरा हेल्थ या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मची ती संस्थापक आहे. तिची ही संस्था महिलांच्या हितासाठी काम करते.

बातम्या आणखी आहेत...