आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा -राजच्या नात्यात दुरावा:नवऱ्याला सोडून मुलांसह वेगळं राहण्याचा विचार करतेय शिल्पा शेट्टी, राज कुंद्राच्या पैशाला स्पर्शही करू इच्छित नाही -मित्राचा दावा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाच्या जवळच्या एका मित्राने हा दावा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत मीडियामध्ये एक नवीन बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, शिल्पा तिच्या मुलांसह पती राज कुंद्रापासून वेगळे राहण्याचा विचार करत आहे. शिल्पाचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला गुन्हे शाखेने 19 जुलै 2021 रोजी पॉर्न फिल्म बनवून अॅपवर रिलीज केल्याप्रकरणी अटक केली होती.

अटक झाल्यापासून राज न्यायालयीन कोठडीत आहे आणि जामीन मिळावा यासाठी त्याची टीम सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा राजची पत्नी शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे.

शिल्पाला राज कुंद्राच्या पैशाला स्पर्शही करायचा नाही
रिपोर्टनुसार, शिल्पाच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, राज कुंद्राच्या अडचणी सध्या तरी कमी होताना दिसत नाहीयेत. राजचे रहस्य समोर आल्यापासून शिल्पाला मोठा धक्का बसला आहे. शिल्पाचा मित्र म्हणाला, "सर्व सुखसोयी या मार्गाने येत आहेत याची शिल्पाला कल्पना नव्हती. तिला राज कुंद्राच्या पैशाला हातही लावायचा नाही. शिल्पा काम करत आहे आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी ती सक्षम आहे."

शिल्पाच्या या मित्राने पुढे सांगितल्यानुसार, शिल्पाने इंडस्ट्रीतील प्रत्येकाला सांगितले आहे की, ती 'हंगामा 2' आणि 'निकम्मा' नंतर चित्रपट करण्यास तयार आहे. अनुराग बसू आणि प्रियदर्शन यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी भूमिकादेखील ऑफर केल्याचे समजते.

शिल्पा शेअर करत आहे प्रेरणादायी पोस्ट
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने शूटिंग आणि सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. मात्र ॉ महिन्याभरानंतर ती 'सुपर डान्सर 4'च्या चित्रीकरणावर परतली आणि सोबतच पुन्हा एकदा सोशल मीडियावरदेखील सक्रिय झाली. सध्या ती प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच, तिने 'सुपर डान्सर चॅप्टर 4'च्या सेटवरीवरील तिच्या ग्लॅमरस लूकचा एक फोटोही शेअर केला होता, ज्यात तिने इंडो-वेस्टर्न स्टाइलची डिझायनर साडी नेसली होती.

बातम्या आणखी आहेत...