आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अ‍ॅक्टरचे फ्लॉप बहीणभाऊ:अरबाज खान, बॉबी देओलपासून ते तनीषा मुखर्जीपर्यंत, आपल्या बहीणभावंडांप्रमाणे यशस्वी होऊ शकले नाहीत हे बॉलिवूड अ‍ॅक्टर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्य तरुण-तरुणींना बॉलिवूडमध्ये मोठा संघर्ष करावा लागतो.

सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरुन सतत चर्चा होत आहे. स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये महत्त्व दिले जाते त्यामुळे सामान्य तरुण-तरुणींना बॉलिवूडमध्ये मोठा संघर्ष करावा लागतो, असे म्हटले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही कलाकारांची ओळख करून देणार आहोत ज्यांच्या बहीणभावंडांचे स्टारडम असूनही इंडस्ट्रीमध्ये ते आपली ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरले. हिट कलाकारांच्या फ्लॉप भावंडांविषयी जाणून घ्या...

काजोल देवगण - तनिषा मुखर्जी

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि प्यार तो होना ही था यासारखे हिट चित्रपट देणारी काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जीने 2003 साली श्हह.. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर, तनिषा नील अँड निक्की आणि पॉपकॉर्न सारख्या चित्रपटांमध्येही दिसली तरी ती यशस्वी झाली नाही. बरेच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तनिषा इंडस्ट्रीमध्ये फक्त एक साइड अॅक्ट्रेस ठरली.

शिल्पा शेट्टी - शमिता शेट्टी

शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिताने 2000 च्या मल्टिस्टारर फिल्म मोहब्बतेंद्वारे इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. चित्रपट हिट चित्रपट ठरल्यानंतरही अभिनेत्रीला फारशी ओळख मिळू शकली नाही आणि तिला साइड रोलच्या ऑफर येऊ लागल्या. शमिता बर्‍याच चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसली.

ट्विंकल खन्ना - रिंकी खन्ना

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियांची धाकटी मुलगी रिंकी खन्नाने 1999 साली 'प्यार में कभी कभी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपट काही खास करू शकला नाही. यानंतर, जिस देश में गंगा रहता है, ये है जलवा, मुझे कुछ कहना है या चित्रपटांमध्ये रिंकी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसली. दुसरीकडे, रिंकीची मोठी बहीण ट्विंकल तिच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होती. बादशाह, जब प्यार किसी से होता है आणि मेला या चित्रपटांद्वारे ट्विंकलने बरीच प्रसिद्धी मिळवली. मात्र तिची अभिनय कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही.

मलायका अरोरा - अमृता अरोरा

छैंया-छैंया, मुन्नी बदनाम अशा अनेक हिट गाण्यांमध्ये दिसणारी मलायका अरोरा हा इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिच्याप्रमाणे तिची धाकटी बहीण अमृता मात्र इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवू शकली नाही. फरदीन खानसोबत कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. याशिवाय अमृता ब-याच चित्रपटांमध्ये झळकली मात्र पाहिजे तसे तिचे करिअर घडले नाही.

आदित्य चोप्रा - उदित चोप्रा

इंडस्ट्रीच्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या आदित्य चोप्राने बॉलिवूडमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मोहब्बतें, रब ने बना दी जोडी असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर त्याचा धाकटा भाऊ उदित चोप्रा आतापर्यंत कोणत्याही सोलो हिट चित्रपटाचा भाग झाला नाही. मोहब्बतेंद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणा केल्यानंतर उदित नील अँड निक्की, मेरे यार की शादी है और धूम अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये झळकला.

सनी देओल - बॉबी देओल

दमदार आवाज आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या सनी देओल यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये गदर, अर्जुन, घायल यासारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्याचवेळी त्यांचा धाकटा भाऊ बॉबी चित्रपटसृष्टीत फारशी कमाल दाखवू शकला नाही. 1995 साली बरसात या चित्रपटाद्वारे या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला बॉबीला रोमँटिक अंदाजामुळे नक्कीच ओळख मिळाली, मात्र अभिनयाच्या बाबतीत तो सनीपेक्षा खूप मागे होता. काही हिट चित्रपटानंतर बॉबी केवळ मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये दिसू लागला.

सलमान खान- अरबाज खान

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये हम दिल दे चुके सनम, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, असे अनेक चित्रपट दिले आहेत. दुसरीकडे त्याचा भाऊ अरबाज खानची फिल्मी कारकीर्द सुरुवातीपासूनच यशस्वी नव्हती. 1996 मध्ये अरबाजने दरार या चित्रपटात नकारात्मक भूमिकेतून डेब्यू केला होता. चित्रपटाचे कौतुक झाले, मात्र अरबाजचा अभिनय फारसा लोकांना आवडला नाही. त्यानंतर अरबाज प्यार किया तो डरना क्या, गर्व आणि कयामत अशा मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये दिसला.

आमिर खान- फैसल खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मोठा भाऊ फैसल खानने 2002 मध्ये आलेल्या मेल्या चित्रपटातून ओळख मिळवली होती. याआधी तो जो जीता वही सिकंदर आणि कयामत से कयामत तक सारख्या बर्‍याच चित्रपटात साइड रोल साकारताना दिसला. फैसलच्या अभिनयाच्या बळावर फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

अनिल कपूर - संजय कपूर

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये उत्तम चित्रपट देत आहे. त्याचा भाऊ संजय कपूरची अभिनय कारकीर्द मात्र यशस्वी ठरली नाही. 1995 मध्ये त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात प्रेम या चित्रपटाद्वारे केली. मात्र त्याला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही.

बातम्या आणखी आहेत...