आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये सेलिब्रेशन:आयुष्मान खुराणापासून ते शंकर महादेवन आणि शापर्यंत, मदर्स डेनिमित्त सेलेब्स घेऊन येत आहेत स्पेशल गिफ्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी 10 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.

रविवारी मदर्स डेच्या निमित्ताने अभिनेता आयुष्मान खुराना 'माँ' या शीर्षकावर तयार केलेले एक खास गाणे शेअर करणार आहे. याशिवाय शंकर महादेवन आणि शान यांनीही हा दिवस खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली आहे.

याविषयी आयुष्मान म्हणाला, 'आई तिच्या मुलावर कुठल्याही अटीशिवाय प्रेम करते आणि तिच्या प्रत्येक बलिदानासाठी, प्रत्येक दिवसाला' मदर्स डे 'म्हटले पाहिजे. तरीदेखील एक खास दिवस आपल्या आईसाठी समर्पित असेल, हे देखील खरोखरच सुंदर आहे.'

मदर्स डेच्या निमित्ताने आपला प्लान सांगताना आयुष्मान म्हणाला, 'यावेळी मी सर्व मातांना समर्पित माँ या शीर्षकावरील एक गाणे पोस्ट करणार आहे. मातृत्वाच्या भावनेने मला नेहमीच आश्चर्यचकित केले आहे. मी कायम काळजी घेणारी, संगोपन करणा-या शक्तीच्या कौतुकासाठी आदरपूर्वक गात राहणार.'

आयुष्मान त्याचा मित्र आणि संगीतकार रोचक कोहलीसोबत या गाण्यावर काम करत आहे. या हृदयस्पर्शी ट्रॅकला रोचकनेही आपला आवाज दिला आहे. गुरप्रीत सैनी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

गायक शंकर महादेवन आणि शान यांनी 'गो नट्स' एपचा वापर करून मदर्स डेसाठी पर्सनल व्हिडिओ तयार केला आहे ज्यात त्यांनी त्यांच्या सुंदर आवाजात एक गाणेही गायले आहे. आपल्या प्लान्सविषयी सांगताना शंकर म्हणतात, 'आमच्यासाठी न थांबता सतत मेहनत करणारी माता प्रत्येक कुटुंबाचा पाया आहे. आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ते साजरे करायला हवे.'

बातम्या आणखी आहेत...