आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 चे चित्रपट:'कुली नंबर 1'पासून ते 'लव आज कल 2'पर्यंत यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांचा केला अपेक्षाभंग

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकांची निराशा करणारे कोणते आहेत हे चित्रपट जाणून घ्या...

या वर्षी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट डिजिटली रिलीज केले गेले. यापैकी काही असे चित्रपट होते, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. मात्र या चित्रपटांनी प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला. प्रेक्षकांची निराशा करणारे कोणते आहेत हे चित्रपट त्यावर टाकुयात एक नजर -

कुली नंबर 1

वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर 'कुली नंबर 1' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला. हा सिनेमा 1997 च्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या कुली नंबर 1 चा रिमेक आहे, ज्यात गोविंदा आणि करिश्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. वरुण-साराचा चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वरुणचा अभिनय आणि काही अ‍ॅक्शन सीन्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जातेय. मूळ चित्रपटाने प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन केले तर हा रिमेक मोठा अपेक्षाभंग करणारा ठरला.

खाली पिली

16 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या 'खाली पिली' या चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कधी स्टार किड्सची चित्रपटातील वर्णी तर कधी बियॉन्से शर्मा जाएगी या गाण्यावरुन झालेला वाद, यामुळे हा चित्रपट वादात सापडला. मकबूल खान दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

सडक 2
डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेला ‘सडक 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना निराश करणारा ठरला. हा चित्रपट 1991 च्या सडकचा सिक्वेल होता, ज्याला महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केले होते. हा चित्रपट
90च्या दशकातील हिट चित्रपट होता. त्यामुळे रिमेककडूनही लोकांना जास्त अपेक्षा होत्या. मात्र रिमेकवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर,
संजय दत्त स्टारर सडक 2 प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवण्यात अपयशी ठरला.

लव आज कल 2

2006 साली रिलीज झालेल्या लव आज कल या चित्रपटाचा रिमेक यंदा व्हॅलेंटाईन डेनिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दोन वेगवेगळ्या दशकातील प्रेमकहाणी यात दाखवली गेली होती. परंतु कार्तिक दोन्ही भूमिकांमध्ये वेगळी छाप सोडू शकला नाही. मूळ चित्रपटाच्या तुलनेत लव आज कल 2 फ्लॉप असल्याचे सिद्ध झाले.

शिकारा

विधु विनोद चोप्रा यांचा शिकारा हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. चित्रपटात मुख्य मुद्याऐवजी लव्ह स्टोरीवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले, ज्याने प्रेक्षकांना निराश केले. शिकारावर आधारित हा चित्रपट बर्‍याच वादात सापडला असला तरी तो रिलीज झाल्यानंतर मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळाला. निर्मात्यांकडून बर्‍याच महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे आणि प्रेक्षकांपर्यंत अर्धवट कहाणी पोहोचली.

बातम्या आणखी आहेत...