आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा लग्नाच्या दीड महिन्यातच प्रेग्नेंट असल्याने चर्चेत आहे. दीयाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले होते. अलीकडेच मालदीवमध्ये हनीमूनला गेलेल्या दीयाने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करुन ती आई होणार असल्याचे सांगितले. तिच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. प्रेग्नेंट असल्यामुळेच दीयाने लग्न केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.
लग्नाआधीच प्रेग्नेंट राहणारी दीया ही पहिली अभिनेत्री नाही. याआधीही बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या. एक नजर टाकुयात -
नेहा धुपियाने 10 मे 2018 मध्ये अंगद बेदीसोबत लग्न केले. त्यांनी दिल्लीतील गुरुद्वारात जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनीच नेहा प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. याबद्दलचा खुलासा खुद्द नेहानेच 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमातून तिने केला होता. लग्नाआधीच नेहा प्रेग्नेट असल्याचे नेहा आणि अंगद यांनी मान्य केले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये नेहाने मुलगी मेहरला जन्म दिला.
लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याही नावाचा उल्लेख होतो. श्रीदेवी बोनी कपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघांनी 1996 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच त्यांनी मुलगी जान्हवीला जन्म दिला होता. लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचे श्रीदेवी यांनी मीडियासमोर कबूल केले होते. लग्नाच्या वेळी त्या सात महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या.
कोंकणाने 2007 मध्ये रणवीर शौरीसोबत डेटिंग सुरु केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2010 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या सहा महिन्यांनी कोंकणाने मुलगा हारुनला जन्म दिला होता. यावरुन कोंकणा लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट झाले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या देखील लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. नीना गुप्ता या प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनमध्ये होत्या. विवियन यांनी पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नीना यांचे लग्न झाले नाही. परंतु विवियन यांच्यापासून झालेली मुलगी मसाबा हिला त्यांनी जन्म देऊन एकटीने वाढवले.
कमल हसन जेव्हा सारिकासोबत लिव्ह इनमध्ये होते, त्याच काळात सारिका गर्भवती असल्याची बातमी समोर आली होती. 28 जानेवारी 1986 रोजी श्रुती हसनचा जन्म झाला. सारिका आणि कमल यांनी 1988 मध्ये लग्न केले होते. 1991 मध्ये सारिका आणि कमल यांची दुसरी मुलगी अक्षराचा जन्म झाला. 2004 मध्ये कमल आणि सारिका यांचासुद्धा घटस्फोट झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.