आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म प्रकरण:हि-याच्या अंगठीपासून ते  बुर्ज खलिफा फ्लॅटपर्यंत, राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिल्या अनेक महागड्या भेटवस्तू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ही जोडीही खूप लोकप्रिय आहे. राज हा एक मोठा उद्योगपती आहे आणि शिल्पाला महागड्या भेटवस्तू देण्यासाठीही तो प्रसिद्ध आहे.

20 कॅरेटच्या अंगठीपासून ते बुर्ज खलिफामधील फ्लॅटपर्यंत, राजने शिल्पाला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. राज कुंद्रा सध्या अटकेत असून त्याच्यावर अश्लील चित्रपट बनवून अ‍ॅपवर रिलीज केल्याचा आरोप असून सोमवारी उशीरा रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

राज-शिल्पाचे 2009 मध्ये लग्न झाले होते.
राज-शिल्पाचे 2009 मध्ये लग्न झाले होते.

20 कॅरेट हि-याची अंगठी
शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या डायमंड रिंगसाठी ओळखली जाते. राज कुंद्राने शिल्पाला साखरपुड्याला 20 कॅरेटची रिंग घातली होती, ज्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये होती.

बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट
शिल्पा शेट्टीला तिच्या एका वाढदिवसाला राजकडून सर्वात महागडी भेट मिळाली होती. राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफाच्या 19 व्या मजल्यावर शिल्पासाठी फ्लॅट घेतला होता. काही अहवालानुसार शिल्पाने 2016 मध्ये ही मालमत्ता विकली.

यूकेमध्ये 7 बेडरूमचा व्हिला
राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीसाठी आणखी एक महाग संपत्ती विकत घेतली. त्याने यूकेमध्ये 'राज महल' नावाचा एक 7-बेडरूमचा व्हिला खरेदी केला. त्याला 'राज महल' असे नाव दिले आहे.

शिल्पा-राजचा मुंबईतील व्हिला 'किनारा' आतून असा दिसतो.
शिल्पा-राजचा मुंबईतील व्हिला 'किनारा' आतून असा दिसतो.

मुंबईत सी फेसिंग व्हिला
असे म्हणतात की, शिल्पाचे मुंबईत समुद्रकिनारी व्हिला बांधण्याचे स्वप्न होते आणि तिचे हे स्वप्न राज कुंद्राने पूर्ण केले. येथे दोघेही आता जास्तीत जास्त काळ या घरात घालवतात. या बंगल्याचे नाव शिल्पा आणि राज यांनी 'किनारा' असे ठेवले आहे..

ही मर्सिडीज बेंझ कार राजने शिल्पाला भेट म्हणून दिली होती.
ही मर्सिडीज बेंझ कार राजने शिल्पाला भेट म्हणून दिली होती.

लक्झरी कार
राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला अनेक लक्झरी कार भेट म्हणून दिल्या आहेत. यात बीएमडब्ल्यू झेड 4 चा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...