आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वीकली रिलीज अपडेट:'दिल बेचारा'पासून ते 'शकुंतला देवी'पर्यंत,  24 ते 31 जुलै दरम्यान हे 5 चित्रपट होणार आहेत डिजिटली रिलीज

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे अनेक मोठे चित्रपट आता ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. 24 ते 31 जुलै दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'पासून ते नवाजुद्दीनच्या 'रात अकेली है'पर्यंत अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

S No.चित्रपटरिलीज डेटप्लॅटफॉर्म
1दिल बेचारा24 जुलैडिस्ने प्लस हॉटस्टार
2यारा30 जुलैजी 5
3शकुंतला देवी31 जुलैअॅमेझॉन प्राइम
4रात अकेली है31 जुलैनेटफ्लिक्स
5लूटकेस31 जुलैडिस्ने प्लस हॉटस्टार

दिल बेचारा 

 • रिलीज डेट - 24 जुलै
 • प्लॅटफॉर्म - डिस्ने प्लस हॉटस्टार
 • दिग्दर्शक- मुकेश छाबरा
 • कलाकार- सुशांत सिंह राजपूत (मॅनी), संजना सांघी (किजी बासू), सैफ अली खान (आफताब खान), साहिल वैद्य, जावेद जाफरी, मिलिंद गुणाजी, स्वस्तिका मुखर्जी.
 • कथा- या चित्रपटात मॅनी आणि किझी या दोन किशोरवयीन मुलांची प्रेमकथा आहे, ज्यांच्या आयुष्यात काही घटना घडून गेल्या आहेत, मात्र तरीही त्यांना आयुष्य जगण्याची इच्छा आहे. एकमेकांना भेटून दोघांना पुन्हा एकदा जगण्याचे कारण मिळते.

रात अकेली है

 • रिलीज डेट - 31 जुलै
 • प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
 • दिग्दर्शक- हनी त्रेहान
 • कास्ट- नवाजुद्दीन सिद्दीकी (इन्स्पेक्टर जटील यादव), राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, तिग्मांशू धूलिया, शिवानी रघुवंशी.
 • कथा- या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिस इन्स्पेक्टर जटील यादवची भूमिका साकारत आहेत, तो एका छोट्या शहरातून असतो. त्याला एका राजकारण्याच्या खुनाचा तपास करण्याची संधी मिळते, ज्यात अनेक हाय प्रोफाइल लोकांचा समावेश असतो. तो हे प्रकरण कसे सोडवतो या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.

शकुंतला देवी

 • रिलीज डेट - 31 जुलै
 • प्लॅटफॉर्म - अॅमेझॉन प्राइम
 • दिग्दर्शक- अनु मेनन
 • कलाकार- विद्या बालन (शकुंतला देवी), सान्या मल्होत्रा ​​(अनुपमा बॅनर्जी), जीशु सेनगुप्ता (परितोष बॅनर्जी, शकुंतला देवीचे पती), अमित साध (अजय कुमार).
 • कथा- या चित्रपटाची कथा मानवी संगणका म्हणून ओळखल्या जाणा-या गणितज्ञ शकुंतला देवीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर आधारित आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यापासून ते मुलीसोबतच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. 

यारा

 • रिलीज डेट - 30 जुलै
 • प्लॅटफॉर्म - जी 5
 • दिग्दर्शक- तिग्मांशू धूलिया
 • कलाकार- विद्युत जामवाल (फगुन), श्रुती हासन (सुकन्या), अमित साध (मितवा), विजय वर्मा (रिझवान), कॅनी बासुमतारी (बहादूर), संजय मिश्रा (चमन).
 • कथा- हा चित्रपट फागुन, मितवा, रिझवान आणि बहादूर या चार मित्रांची कहाणी आहे. हे चारही जण भारत-नेपाळ सीमेवर आपल्या ऑपरेशनला अंतिम रुप देतात. हा चित्रपट 2011 मध्ये आलेल्या ए गँग स्टोरी या फ्रेंच चित्रपटाचा रिमेक आहे.

लूटकेस

 • रिलीज डेट - 31 जुलै
 • प्लॅटफॉर्म - डिस्ने प्लस हॉटस्टार
 • दिग्दर्शक- राजेश कृष्णन
 • कास्ट- कुणाल खेमू (नंदन कुमार), रसिका दुग्गल (लता, नंदनची पत्नी), विजय राज (बाळा ठाकूर), गजराज राव (आमदार पाटील), रणबीर शोरे (इन्स्पेक्टर कोटले).
 • कथा- या चित्रपटाची कथा नंदन या एका सामान्य माणसावर आधारित आहे, त्याच्या आयुष्यात सुख आणि शांती नाही. अचानक एक दिवस त्याला पैशांनी भरलेली सूटकेस मिळते, ज्यामुळे तो प्रथम घाबरून जातो पण नंतर तो मोठी स्वप्ने बघू लागतो. दुसरीकडे, बाळा ठाकूर, ज्याची ती बॅग असते, ती तो गुंडांच्या माध्यमातून शोधत असतो. या आमदाराला त्याची सुटकेस मिळते का? नंदनची स्वप्न पूर्ण होतात का? याभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार क्लॅश 

31 जुलै रोजी शकुंतला देवी, रात अकेली है, यारा आणि लूटकेस हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. त्यामुळे या चारही चित्रपटांमध्ये क्लॅश होणार आहे.  या चारही चित्रपटांचा प्रीमियर एकाच दिवशी ठेवण्यात आला आहे. तथापि, ओटीटी प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे यावर चित्रपट कधीही पाहिले जाऊ शकतात.