आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉलिवूडला बॉलिवूड सेलिब्रिटींचा नकार:गोविंदा, हृतिकपासून ते इरफान खान, ऐश्वर्यापर्यंत, बॉलिवूड कलाकारांनी नाकारले हॉलिवूडचे ब्लॉकबस्टर सिनेमे

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉलिवूडचे चित्रपट नाकारले आहेत.

बॉलिवूडचे अनेक स्टार्स हॉलिवूडमध्ये पोहोचले आहेत. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, इरफान खान यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, परंतु असे बरेच स्टार्स आहेत, ज्यांनी हॉलिवूड चित्रपट करण्यास नकार दिला आहे. चला जाणून घेऊया ते सेलिब्रिटी कोण आहेत -

 • गोविंदा - अवतार

लोकप्रिय अभिनेता गोविंदाला जेम्स कॅमेरुनच्या ‘अवतार’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र गोविंदाने ती भूमिका करण्यास नकार दिला होता. गोविंदाने स्वत: एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला होता. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार त्यानेच जेम्स कॅमेरुनला चित्रपटाचे शीर्षक 'अवतार' ठेवण्याचा सल्ला दिला होता. दिग्दर्शकानेही त्याचा सल्ला ऐकला. 2009 मध्ये रिलीज झालेला अवतार हा चित्रपट ब्लॉरबस्टर ठरला होता. अवतार या हॉलिवूड चित्रपटाशिवाय गोविंदाने ताल, गदर आणि देवदास यासारखे चित्रपटही नाकारले होते.

 • इरफान खान - इंटरस्टेलर

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खानने बॉलिवूडशिवाय हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. इरफानने ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट इंटरस्टेलरची ऑफर नाकारली होती. मात्र अमेझिंग स्पायडर-मॅन, जुरासिक वर्ल्ड, इन्फर्नो आणि लाइफ ऑफ पाय यासारख्या चित्रपटांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. इरफानने ऑफर नाकारल्यानंतर इंटरस्टेलर हा चित्रपट मॅट डेमनकडे गेला. खरं तर इरफानच्या करिअरसाठी ही एक मोठी संधी होती. मात्र लंच बॉक्स या बॉलिवूड चित्रपटाच्या कमिटमेंटमुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला होता.

 • हृतिक रोशन- पिंक पँथर

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला 2006 मध्ये रिलीज झालेल्या पिंक पँथर या चित्रपटात विंसेट या भूमिकेची ऑफर आली होती. पण बॉलिवूडच्या वचनबद्धतेमुळे अभिनेत्याने या चित्रपटाला नकार दिला होता.

 • प्रियांका चोप्रा - इमोर्टल

हॉलिवूडमध्ये धमाका करणार्‍या प्रियांका चोप्राने पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारली होती. बेवॉच आणि क्वांटिकोच्या आधी प्रियांकाला इमोर्टल या चित्रपटात भूमिका मिळाली होती, पण ‘सात खून माफ’ या चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे तिने या ऑफरला नकार दिला होता.

 • दीपिका पदुकोण - फ्युरियस 7

Xxx - द रिटर्न ऑफ जेंडर केज या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणा-या दीपिका पदुकोणला 2015 मध्ये रिलीज झालेल्या फ्युरियस 7 या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र तिने जगभरात गाजलेल्या या चित्रपटाला नकार दिला होता. फ्यूरियस 7 चित्रपट पॉल वॉकरचा शेवटचा चित्रपट होता. असे म्हणतात की, शाहरुख खानसोबतच्या हॅपी न्यू इयर या चित्रपटात व्यस्त असल्यामुळे दीपिकाने हा चित्रपट नाकारला होता.

 • नसीरुद्दीन शाह- हॅरी पॉटर

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना हॅरी पॉटर या हॉलिवूड फँटसी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. या चित्रपटात नसीरुद्दीन यांना प्रोफेसर अल्बस डंबलडोरची भूमिका ऑफर झाली होती, पण ऑडिशन देताना नसीर यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत ही मोठी भूमिका त्यांच्या हातातून निघून गेली. ही भूमिका सर्वप्रथम रिचर्ड हॅरिसने साकारली होती, त्यानंतर या भूमिकेत मायकल गॅम्बन झळकले होते.

 • शाहरुख खान - स्लमडॉग मिलेनिअर

जगभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेल्या शाहरुख खानने अनेकदा ऑस्कर जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र त्याने स्वतःच ही संधी हातून गमावली. किंग खानला ‘स्लमडॉग मिलनिअर’ चित्रपटात गेम शो होस्ट प्रेम कुमारची भूमिका ऑफर झाली होती. पण शाहरुखने ती ऑफर नाकारली. नंतर ही भूमिका अनिल कपूरकडे गेली. त्यावर्षी या चित्रपटाला अनेक ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

 • ऐश्वर्या राय - ट्रॉय

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवणा-या ऐश्वर्या रायला 2004 मध्ये ब्रॅड पिटसह ट्रॉय याचित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती पण अभिनेत्रीने ती नाकारली. ऐश्वर्याने चित्रपटाला नकार देण्यामागचे कारण चित्रपटातील अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन हे होते. वोल्फगेन पीटरसन दिग्दर्शित हा एक अ‍ॅक्शन चित्रपट होता.

 • रोनित रॉय - झीरो डार्क थर्टी

टेलिव्हिजनसह बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारा रोनित रॉय हॉलिवूडमध्ये मात्र स्वतःची ओळख निर्माण करु शकला नाही. ‘झिरो डार्क थर्टी’ या हॉलिवूड चित्रपटात या अभिनेत्याला महत्वाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु 2012 च्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटामुळे रोनित ती भूमिका स्वीकारु शकला नाही. रोनितला ऑफर झालेला हॉलिवूडचा हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता आणि त्याला ऑस्करमध्ये अनेक नामांकनेही मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...