आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 अभिनेत्रींनी साकारली राणी एलिझाबेथची भूमिका:हेलन मिरेनपासून क्रिस्टन स्कॉटपर्यंत, या अभिनेत्रींनी केला राणीचा उत्कृष्ट अभिनय

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीश साम्राज्यावर 70 वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. राणी एलिझाबेथ 1952 पासून आतापर्यंत ब्रिटनसह इतर 14 देशांच्या राणी होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी गादी सांभाळली होती. त्यांच्या स्टाईल आणि ग्लॅमरने जगाला वेड लावले होते. अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनेत्रींनी एलिझाबेथ II ची भूमिका वठवली. नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सिरीज 'द क्राउन' असो किंवा अकादमी पुरस्कार विजेता चित्रपट 'द किंग्स स्पीच' असो, अनेक चित्रपटांमध्ये राणी एलिझाबेथ यांचे आयुष्य जवळून बघता आले. चला तर मग अशाच काही अभिनेत्रींवर एक नजर टाकूया ज्यांना राणी एलिझाबेथच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली.

हेलन मिरेन - द क्वीन

हेलन मिरेनने 2006 मध्ये आलेल्या 'द क्वीन' चित्रपटात राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी हेलन मिरेन यांना अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. यासोबतच या चित्रपटाला बेस्ट पिक्चर्स, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट स्टोरी, उत्कृष्ट डायरेक्शन, कॉश्च्युम डिजाइन आणि म्यूजिक या श्रेणीत नामांकन मिळाले होते. प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दिग्दर्शक स्टीफन फ्रेयर्स यांनी एलिझाबेथ यांच्या आयुष्यातील क्षण पडद्यावर चित्रीत केले होते.

क्रिस्टन स्कॉट थॉमस - द ऑडियंस

हेलन मिरेन आणि क्रिस्टन स्कॉट थॉमस या दोघांनी नेटफ्लिक्स वेब सिरीज 'द ऑडियंस'मध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये एलिझाबेथ यांची राणी बनण्याची कथा पडद्यावर चित्रीत करण्यात आली. ही सिरीज नेटफ्लिक्सच्या 'द क्राउन' या वेब सिरीजवरून प्रेरित आहे. यासाठी हेलन मिरेन यांना टोनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात राणी एलिझाबेथ यांच्या पंतप्रधानांसोबतच्या मिटिंगबद्दल सांगण्यात आले आहे, ही एक खासगी मिटिंग असून जी दररोज होते.

क्लेअर फॉय - द क्राउन

2016 मध्ये, क्लेअर फॉय नेटफ्लिक्सवर आलेल्या द क्राउन या वेब सिरीजमध्ये क्वीन एलिझाबेथ II च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला गोल्डन ग्लोब आणि अॅक्टर्स गिल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात क्लेअरने राणीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत या सिरीजमध्ये मॅट स्मिथने एलिझाबेथ यांचे पती फिलिप आणि व्हेनेसा किर्बीने त्यांची बहीण मार्गारेटची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये राणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगण्यात आले आहे.

ऑलिव्हिया कॉलमेन - द क्राउन नेटफ्लिक्सची वेब सिरीज द क्राउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमध्ये ऑलिव्हियाने एलिझाबेथ II ची भूमिका केली होती. या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, ज्यासाठी तिला एमी आणि गोल्डन ग्लोब असे दोन्ही पुरस्कार मिळाले होते. सिरीजच्या तिसर्‍या भागात विन्स्टन चर्चिलचा मृत्यू आणि या कठीण काळात राजघराणे परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे गेले होते, ते दाखवण्यात आले होते.

इमेल्डा स्टॉन्टन - "द क्राउन"

इमेल्डा स्टॉन्टनने द क्राउनच्या पाचव्या आणि सहाव्या सीझनमध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका केली होती. या सीझनमध्ये प्रिन्स फिलिपची भूमिका जोनाथन प्राइसे, राजकुमारी मार्गारेटची भूमिका लेस्ली मॅनव्हिलने आणि प्रिन्स चार्ल्सची भूमिका डॉमिनिक वेस्टने साकारली होती. या सीझनमध्ये राजघराण्यातील 90 चे दशक पडद्यावर आणण्यात आले आहे.

एम्मा थॉमसन - वॉकिंग द डॉग्स

ब्रिटीश डेम एम्मा थॉमसनने ब्रिटीश टीव्ही चित्रपट "प्लेहाऊस प्रेझेंट्स: वॉकिंग द डॉग्स" मध्ये राणी एलिझाबेथ II ची भूमिका केली आहे. 2012 मध्ये रिलीज झालेला या चित्रपटात 1982 मधील बकिंगहॅम पॅलेसची कथा दाखवण्यात आली.

सारा गिडोन - द रॉयल नाईट आऊट

2015 च्या रोमँटिक कॉमेडी ड्रामा फिल्म 'द रॉयल नाईट आऊट'मध्ये सारा गिडोनने तरुण राजकुमारीची भूमिका साकारली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपात शांतता प्रस्थापित झाली त्या रात्री बकिंगहॅम पॅलेसमध्ये झालेल्या गदारोळावर चित्रपट भाष्य करतो.

नावे कॅम्पवेल - चर्चिल: हॉलिवूड इयर्स

नावे कॅम्पवेल 2004 च्या विडंबन चित्रपट चर्चिल: द हॉलिवूड इयर्समध्ये राणी एलिझाबेथच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धादरम्यान विस्टन चर्चिलची कथा दाखवण्यात आली आहे.

फ्रेया विल्सन - द किंग्स स्पीच

किंग जॉर्ज IV ची कथा 2010 च्या ऐतिहासिक ड्रामा फिल्म द किंग्स स्पीचमध्ये सांगितली आहे. या चित्रपटात फ्रेया विल्सन एलिझाबेथ II च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अकादमी पुरस्कार मिळाला होता. यासोबतच चित्रपटातील कलाकारांनाही अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाला 12 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.

जेन अलेक्झांडर - विलियम अँड कॅथरीन: अ रॉयल रोमान्स

एमी आणि टोनी पुरस्कार विजेत्या जेन अलेक्झांडरने 2011 च्या विलियम अँड कॅथरीन: अ रॉयल रोमान्स चित्रपटात राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांच्या नात्यावर भाष्य करतो.

जेनेट चार्ल्स - द नेकेड गन: फ्रॉम द फाइल्स ऑफ द पुलिस स्काड!

या चित्रपटात जेनेट चार्ल्सने राणी एलिझाबेथचा 50 वर्षांचा प्रवास पडद्यावर दाखवला आहे. या चित्रपटातील जेनेटची भूमिका राणीला आवडली नव्हती. यानंतर जेनेटने माफी मागितली होती.

मॅगी सुलिवान - "हॅरी अँड मेगन, अ रॉयल रोमान्स"

हॅरी अँड मेगन, अ रॉयल रोमान्स या चित्रपटात मॅगी सुलिवानने राणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या नात्याची कथा आणि मीडियासमोर आलेली त्यांची कहाणी पडद्यावर साकारण्यात आली होती.

बारबरा फ्लिन - द क्वीन
द क्वीन ही टीव्ही मालिका 2009 मध्ये यूके चॅनल 4 वर प्रसारित झाली होती. या टीव्ही सीरियलमध्ये 5 अभिनेत्रींनी राणी एलिझाबेथची भूमिका साकारली होती. बारबरा फ्लिन, सामंथा बाँड, एमिलिया फॉक्स, सुसान जेमिसन आणि डायना क्की यांनी एलिझाबेथ II च्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे पडद्यावर साकारले. या मालिकेत राणी एलिझाबेथच्या आयुष्याचा प्रवास पडद्यावर आणण्यात आला आहे.

रोझमेरी लीच - मार्गारेट

दिवंगत अभिनेत्री रोझमेरी लीच यांनी 2009 मध्ये आलेल्या मार्गारेट चित्रपटात राणी एलिझाबेथ II ची भूमिका साकारली होती. पंतप्रधान मार्गारेट यांचा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...