आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्स आणि आत्महत्या:जिया खानपासून सुशांत सिंह राजपूतपर्यंत, कमी वयातच या सेलिब्रिटींनी आत्महत्या करुन जगाचा कायमचा घेतला निरोप

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी उचलेले टोकाचे पाऊल...

'निशःब्द', हाऊसफुल 'आणि' गजनी 'सारख्या चित्रपटात झळकलेली जिया खान 3 जून 2013 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी जुहूच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे वाटले होते. पण नंतर जियाच्या आईने जियाचा बॉयफ्रेंड सूरज पंचोलीवर खुनाचा आरोप केला होता. वृत्तानुसार, मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी जिया गर्भवती होती. प्रियकर सूरजने जियाला गर्भपात करण्याचे औषध दिले होते आणि त्यानेच टॉयलेटमध्ये भ्रूण टाकले होते. असे म्हणतात की, या घटनेनंतर जिया पुरती कोलमडली होती. सूरजनेही तिच्यापासून अंतर निर्माण करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर जिया नैराश्यात गेली. काही दिवसांनी तिने आत्महत्या केली. जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपात सूरज एक महिना तुरुंगात राहिला होता त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.

जियाच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी अगदी कमी वयातच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. एक नजर टाकुया या सेलेब्सवर...

सुशांत सिंह राजपूत

गेल्यावर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतने नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र नंतर सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. इतकेच नाही तर सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर पैशांची अफरातफर केल्याचाही आरोप केला होता. या प्रकरणी रियाला अटक झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे, मात्र वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

प्रत्युषा बॅनर्जी

'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जी 1 एप्रिल 2016 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिचा प्रियकर राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. प्रत्युषावर प्राणघातक हल्ला केल्याचाही राहुलवर आरोप होता. मृत्यूच्या वेळी प्रत्युषा 25 वर्षांची होती.

प्रेक्षा मेहता

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने मागील वर्षी 25 मेच्या रात्री इंदूरच्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. प्रेक्षाने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, "माझ्या भंगलेल्या स्वप्नांमुळे माझा आत्मविश्वास ढासळला आहे. मी मृत स्वप्नांसह जगू शकत नाही. या नकारात्मकतेसह जगणे कठीण आहे. मी वर्षभरापासून खूप प्रयत्न केले, पण आता मी खूप थकलीय."

मनमीत ग्रेवाल

32 वर्षीय अभिनेता मनमीत ग्रेवाल याने मागील वर्षी 15 मे रोजी आपल्या नवी मुंबईतील निवासस्थानी फॅनला लटकून आत्महत्या केली होती. मनमीत लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. अनेक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. मनमीतने सब टीव्हीवरील ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ मालिकेत काम केले होते. मनमीतचा मित्र मंजीत सिंगने एका बातचीतमध्ये सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी मनमीतच्या मित्रानेही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तोही आर्थिक संकटातून जात होता. दोघांनी फॉरेन ट्रीपसाठी कर्ज घेतले होते आणि ते नंतर फेडू शकत नव्हते.

कुशल पंजाबी

26 डिसेंबर 2019 च्या रात्री कुशलने स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. कुशलच्या निधनानंतर त्याच्या वैवाहिक आयुष्यात आलबेल नसल्याचे समोर आले होते. कुशल पत्नी ऑड्रे डोलहेनपासून विभक्त झाल्याने नैराश्यात होता. त्याच्या मृत्यूसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...