आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • From Kangana Ranaut, Ankita Lokhande To 'Dil Bechara' Director Mukesh Chhabra, Celebs Lit Candles For Sushant, Supporting Over 2 Million People

#Candle4SSR कँपेन:कंगना रनोट, अंकिता लोखंडेपासून 'दिल बेचारा' डायरेक्टर मुकेश छाबडापर्यंत, सेलेब्सने सुशांतसाठी लावली मेणबत्ती, 2 मिलियनपेक्षा जास्त लोकांचे मिळाले समर्थन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जूनला झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पोलिस याला आत्महत्या म्हणत आहेत. तर दुसरीकडे काही सेलेब्स आणि चाहते अजूनही सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. याप्रकरणी आता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामीही सहभागी झालेले आहेत. सुब्रमण्यम यांनी प्रसिद्ध वकील ईशकरण यांना या प्रकरणी सीबीआय चौकशी करुन घेण्यासाठी नियुक्त केले आहे. मुंबईत कमिश्नरांना सुशांतचे घर सील करण्याची नोटीस पाठवल्यानंतर ईशकरण यांनी 22 जुलैला एका डिजिटल प्रोटेस्टची सुरुवात केली. या प्रोटेस्टमध्ये देशातील 2 मिलियन लोकांसह अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या. यामध्ये कंगना रनोट, अंकिता लोखंडे, शेखर सुमन आणि मुकेश छाबडा यांनीही सुशांतसाठी मेणबत्ती पेटवून समर्थन दिले. 

सुशांतसिंग राजपूतला न्याय मिळावा आणि सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी बुधवारी रात्री आठ वाजता हा शांततापूर्ण निषेध सुरू झाला. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा पहिला फोटो समोर आला ज्यामध्ये त्यांनी सुशांतसाठी मेणबत्ती लावली. थोड्याच वेळात मणिकर्णिका अभिनेत्री कंगना रानोटनेही फोटो शेअर केला. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना बऱ्या मोठ्या व्यक्तींना दोष देत आहे. याला प्लानिंग मर्डर असे म्हणत आहे.

दिल बेचारा दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी लावली मेणबत्ती 

सुशांत सिंगचा शेवटचा ‘दिल बेचार’चित्रपटाचे  दिग्दर्शक मुकेश छाबडा अनेक प्रसंगी त्याच्यासाठी भावनिक होताना दिसले आहेत. दिग्दर्शक असण्याबरोबरच मुकेश सुशांतचे चांगले मित्रही होते. आता जेव्हा संपूर्ण देशाने सुशांतला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा मुकेशनेही यात भाग घेतला. त्यांनी स्वत: मेणबत्ती जळत असल्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

शेखर सुमन यांनी दीप प्रज्वलन करताना महामृत्युंजय मंत्र पठण केले

सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यास सुरुवात करणारे सेलेब शेखर सुमन यांनीही शांततापूर्ण निदर्शनात भाग घेतला. त्यांनी घरात दिवा लावत महामृत्युंजय मंत्र पठणही केले. त्यांनी लिहिले की, सुशांतच्या आठवणीत आणि स्मरणार्थ. तुला लवकरच न्याय मिळावा. सर्व तुझी खूप आठवण काढत आहेत. जिथे आहे तिथे आनंदी राहा.

अंकिता लोखंडेने केले समर्थन 
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही घरात दीवा लावत त्याच्या आनंदाची प्रार्थना केली. ट्विटवर एक फोटो शेअर करत तिने लिहिले , आशा, प्रार्थना आणि शक्ती. जिथे असशील तिथे हसत राहा. अंकिताचे हे पाऊल बघत चाहते तिचे कौतुक करत आहेत.

2 मिलियन लोकांचे मिळाले समर्थन 
वकील ईशकरण द्वारे सुरू केलेल्या या उपक्रमात 8 वाजताच लोकांना सहभाग घेतला. केवळ 2 तासांमध्ये 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी #Candle4SSR हॅशटॅगसह ट्विट करत याला सर्वात मोठा डिजिटल प्रोटेस्ट असे संबोधले. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आतापर्यंत 2 मिलियन लोकांनी आपले समर्थन दिले आहे.