आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये नवीन चेहर्‍यांची एंट्री:मानुषी छिल्लरपासून अहान शेट्टीपर्यंत, 2021 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत हे न्यूकमर्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक नवीन कलाकार यावर्षी बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहेत.

बॉलिवूडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बरेच नवोदित कलाकार आपले नशीब आजमावणार आहेत. काही चित्रपटांचे शूटिंग सुरू असून काही चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार आहे. आज आम्ही तुम्हाला 2021 मध्ये मोठ्या पडद्यावर कोणते नवीन कलाकार दिसणार आहेत, याबद्दल सांगणार आहोत...

मानुषी छिल्लर

2017 मध्ये मिस इंडियाचा मान पटकावणा-या मानुषीने त्याच वर्षी मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर तिने मॉडेल म्हणून अनेक ब्रँड एन्डॉर्समेंट केले आणि आता मानुषी चित्रपटांकडे वळली आहे. अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज' चित्रपटामध्ये मानुषी मुख्य भूमिकेत आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. चित्रपटात ती पृथ्वीराजची पत्नी संयोगिताची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

अहान शेट्टी

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहानही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अलीकडेच त्याच्या 'तडाप' या पहिल्या चित्रपटाची पहिली झलक रिलीज केली गेली. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अहान तारा सुतारियासोबत दिसणार आहे. हा एक अ‍ॅक्शन रोमँटिक चित्रपट असेल.

रश्मिका मंदाना​​​​​​​

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मिशन मजनू' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.

प्रणीता सुभाष

2010 मध्ये 'पोरकी' या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी प्रणीता आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती बॉलिवूडच्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. 'भूज : द प्राइड ऑफ इंडिया', 'हंगामा 2' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे.

अर्जुन कानूनगो

ट्रेंड गायक आणि राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटू अर्जुन एक अभिनेता आणि लाइव्ह परफॉर्मरदेखील आहे. 'राधे: योअर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटात तो सलमान खान सोबत दिसणार आहे. सलमानने स्वत: चित्रपटातील एका खआस भूमिकेसाठी त्याची निवड केली आहे.

बातम्या आणखी आहेत...