आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

और प्यार हो गया:नर्गिस-सुनील, हेमा-धर्मेंद्र यांच्यापासून ते रणवीर-दीपिकापर्यंत, या सेलिब्रिटींना त्यांच्या को-स्टार्समध्ये गवसला आयुष्यभराचा सोबती

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत हे सेलेब्स जाणून घेऊया...

अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या सहकलाकारांसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसले आहेत. सेलिब्रिटींच्या ऑनस्क्रीन रोमान्सचे रुपांतर ख-या आयुष्यातही प्रेमात झाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील काही निवडक जोडप्यांबद्दल जे चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले आणि नंतर लग्न करुन आयुष्यभराचे सोबती झाले...

सुनील दत्त- नर्गिस
बॉलिवूड अभिनेता सुनील दत्त यांनी 1958 मध्ये अभिनेत्री नर्गिस यांच्यासोबत लग्न केले होते. या लग्नापासून या जोडप्याला संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत. संजयच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच 1981 मध्ये नर्गिस यांचे कर्करोगाने निधन झाले होते.

अमिताभ बच्चन- जया भादुरी

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले अमिताभ-जया जंजीर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते. जंजीर हिट झाला तर दोघांनी लंडनला सुट्टी घालवायला जायचे, असे त्यांनी ठरवले होते. जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा बिग बींनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्याकडे सुट्टीवर जाण्याची परवानगी मागितली. वडिलांनी एक अट घातली की दोघांना एकत्र जायचे असेल तर आधी लग्न करावे लागेल. मग काय बिग बींनी 1973 मध्ये जया यांच्याशी लग्न केले.

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने ट्विंकल खन्नासोबत इंटरनॅशनल खिलाडी आणि जुल्मीमध्ये एकत्र काम केले. पण या चित्रपटांदरम्यान दोघांमध्ये फक्त मैत्री होऊ शकली. नंतर दोघांना फिल्मफेअर मॅग्झिनच्या शूटिंगची ऑफर आली. या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकीकडे ट्विंकल तिच्या ब्रेकअपमधून बाहेर पडत होती, तर दुसरीकडे अक्षय शिल्पा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण ट्विंकल आयुष्यात आल्यानंतर अक्षयने शिल्पाकडे पाठ फिरवली. 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकल यांनी लग्न केले आणि त्यांना नितारा आणि आरव ही दोन मुले आहेत.

सैफ अली खान - करीना कपूर
एका मुलाखतीदरम्यान करीना कपूरने सांगितले होते की, टशन हा चित्रपट तिच्यासाठी नेहमीच खास असेल कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला सैफमध्ये तिचा मित्र दिसला. करीना कपूरने जब वी मेटच्या शूटिंगदरम्यान शाहिद कपूरसोबत ब्रेकअप केले होते. यानंतर टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना सैफच्या जवळ आली. त्यांच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा सैफने हातावर सैफिनाचा टॅटू बनवला होता. दोघे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले, त्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. सैफ-करीनाला दोन मुले आहेत.

अजय देवगण- काजोल
बॉलिवूडची सुंदर जोडी अजय आणि काजोल यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. 1995 मध्ये आलेल्या 'हलचल' चित्रपटादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली, त्यानंतर दोघेही जवळपास 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांना चांगले समजून घेतल्यानंतर 1999 मध्ये दोघांनी लग्न केले. या जोडप्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.

अभिषेक बच्चन- ऐश्वर्या राय
कुछ ना कहो आणि ढाई अक्षर प्रेम के शुटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि अभिषेकची मैत्री झाली. ऐश्वर्या त्यावेळी विवेक ओबरॉयला डेट करत होती, तर अभिषेकही राणी मुखर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2006 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी गुरू, उमराव जान आणि धूम 2 असे तीन चित्रपट एकत्र आले. तिन्ही चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघांनी अधिकाधिक वेळ एकत्र घालवायला सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांनी 2007 मध्ये एका शानदार सोहळ्यात लग्न केले. दोघांना एक मुलगी असून आराध्या तिचे नाव आहे.

धर्मेंद्र - हेमा मालिनी
तुम हसीन मैं जवान या चित्रपटाच्या सेटवर बॉलिवूडचे हेमन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी जवळ आले. त्यावेळी धर्मेंद्र यांचे आधीच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते ज्यांना त्यांना बॉबी आणि सनी ही दोन मुले आहेत. हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने त्याची पहिली पत्नी प्रकाश यांच्याकडे घटस्फोट मागितला, पण तिने नकार दिला. नंतर हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला. हेमाची आईही दोघांच्या नात्याच्या विरोधात होती, पण नंतर तिनेही होकार दिला. त्यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.

ऋषी कपूर- नीतू सिंग
नीतू कपूर आणि ऋषी यांची पहिली भेट जहरीला इंसान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यावेळी ऋषी एक लोकप्रिय अभिनेता होते, तर नीतू या 14 वर्षांची नवोदित कलाकार होत्या. लवकरच दोघांची जवळीक वाढू लागली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. वयाच्या मोठ्या अंतरामुळे नीतू यांच्या आईचा या नात्याला विरोध होता, मात्र काही काळानंतर त्यांनी होकार दिला. दोघांनी 1980 मध्ये लग्न केले आणि त्यांना रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर ही दोन मुले आहेत.

रितेश देशमुख - जिनिलिया डिसूझा
रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांना इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल मानले जाते. तुझे मेरी कसमच्या टेस्ट शूटमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले. मस्ती आणि तेरे नाल इश्क हो गया यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्न केले. हे जोडपे रियान आणि राहिल या दोन मुलांचे पालक आहेत.

हे सहकलाकारही बनले खऱ्या आयुष्यात जोडीदार

दीपिका पदुकोण- रणवीर सिंग

राजकुमार राव - पत्रलेखा​​​​​​​

कुणाल खेमू - सोहा अली खान

करण सिंग ग्रोव्हर - बिपाशा बसू

बातम्या आणखी आहेत...