आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनेपर्यंत काय काय घडतं याची उत्सुकता सामान्यांना असते. निवडणुकांचा काळ, त्यात होणारं राजकारण बॉलिवूड चित्रपटांसह अलीकडेच आलेल्या वेब सीरिजमधून दाखविण्यात आले आहे. अनेक दिग्दर्शकांनी राजकारणावर आधारित वेब सीरिजची निर्मिती करत समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या
आणि राजकारणावर आधारित वेब सीरिजविषयी जाणून घेऊया –
या वेब सीरिजमध्ये फुलेरा नावाच्या गावाची कथा दाखवण्यात आली आहे. जिथे ग्रामपंचायत सचिव अभिषेक नावाचा एक अभियांत्रिकी मुलगा (जितेंद्र कुमार) घरापासून दूर असलेल्या गावात अभ्यासासोबत पैसे कमवण्याचे स्वप्न पाहतो. अभिषेकचे सुरुवातीला कामात मन रमत नाही, मात्र हळूहळू त्याला गावातील गोष्टींमध्ये रस वाटू लागतो आणि पंचायत निवडणुका हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी तो घेतो. ही सीरिज 2020 मध्ये अमेझॉन प्राइमवर रिलीज झाली होती.
अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि निर्मित 'तांडव' या वेब सीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी राजकारणापासून ते उत्तराधिकारीचे राजकारण या वेब सीरिजमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. यामध्ये सैफ अली खान, गौहर खान, सुनील ग्रोव्हर आणि डिंपल कपाडिया या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
हुमा कुरेशी स्टारर 'महाराणी' ही या विषयावरची एक उत्तम वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये 90 च्या दशकातील राजकारणाचे चित्रण करण्यात आले आहे. 'महाराणी'ची कथा एका निरक्षर महिलेची आहे जी आपल्या मेहनतीतून आणि कौशल्याने राज्याची मुख्यमंत्री बनते. रिपोर्ट्सनुसार, सोनी लिव्हची ही वेब सीरिज बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या कथेवर आधारित होती, परंतु निर्मात्यांनी त्याचे खंडन केले होते.
हॉटस्टारची वेब सीरिज 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही त्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिजपैकी एक आहे, जी प्रेक्षकांना राजकारण आणि निवडणुकीचा खरा चेहरा दाखवते. या सीरिजमध्ये वारसदार निवडण्याच्या राजकारणापासून ते दलित व्होट बँक, महिलांचे राजकारण आणि मुख्यमंत्र्यांचा संसदेपर्यंतचा प्रवास यावर तिखट टीका करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये प्रिया बापट, सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी आणि एजाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
2019 मध्ये आलेली 'क्वीन' ही वेब सीरिज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. राधा कृष्णन यांनी या वेब सीरिजमध्ये थलायवीची भूमिका साकारली होती. या मालिकेत जयललिता यांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.