आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे बेबो:पृथ्वीराजपासून ते करीना-रणबीर-नव्या नवेलीपर्यंत, जाणून घ्या कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्याविषयी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील मोठे घराणे आहे.

कपूर घराण्याची लाडकी लेक करीना कपूर 21 सप्टेंबर रोजी 40 वर्षांची झाली आहे. करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. करीना आता प्रेग्नेंट असून लवकरच ती आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. करीना राज कपूर यांची नात आहे. कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील मोठे घराणे आहे. अभिनय तर या घराण्याच्या रक्तात आहे. याच कारणामुळे भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या घराण्याच्या प्रत्येक पिढीने अभिनय क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते यूथ आयकॉन रणबीर कपूरपर्यंत प्रत्येकाने या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. आज करीना, रणबीर त्यांच्या अभिनयाचा हा वारसा पुढे चालवत आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की कपूर घराणे मुळचे पाकिस्तानातील पेशावरमधील आहे. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. या कुटुंबात हिंदू, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांचा समावेश आहे. शशी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत विवाह केला होता. तर त्यांची भाची रीमा कपूरचे लग्न मोहन जैनसोबत झाले आहे. इतकेच नाही तर करीना कपूरचे पती सैफ अली खान पतौडी घराण्याचे नवाब आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कपूर घराण्याच्या सहा पिढ्यांबद्दल सांगत आहोत. शिवाय या घराण्यातील अशा काही सदस्यांविषयी सांगतोय, ज्यांच्याविषयी तुम्हाला ठाऊक नाहीये.

 • पृथ्वीराज कपूर (3 नोव्हेंबर 1901 ते 29 मे 1972)

दिवंगत पृथ्वीराज कपूर यांचा जन्म पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दीवान बशीश्वरनाथ कपूर आणि आईचे नाव रामशरणी मेहरा होते. दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी राज कपूर यांच्या गाजलेल्या आवारा सिनेमात एक कॅमिओ रोल केला होता. कपरू घराण्यात पृथ्वीराज कपूर यांनी अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला पहिला बोलपट दिला. 6 फूट 2.5 इंच उंची असलेले पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी होती. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर ही त्यांच्या मुलांची नावे तर उर्मिला सियाल हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.

 • राज कपूर (14 डिसेंबर 1924 ते 2 जून 1988)

पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांनी कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आणि हिंदी सिनेसृष्टीला मोलाचे योगदान दिले. राज कपूर यांनी एकाहून एक दर्जेदार कलाकृती दिल्या. आवारा, मेरा नाम जोकर, श्री 420 हे त्यांचे सिनेमे बरेच गाजले. राज कपूर यांचे लग्न कृष्णा कपूर यांच्यासोबत झाले होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर ही राज कपूर यांच्या मुलांची नावे आहेत. याशिवाय राज कपूर यांना दोन मुलीसुद्धा आहेत. रीमा जैन आणि रितू नंदा ही त्यांची नावे. कृष्णा कपूर अधूनमधून सोशल इवेंट्समध्ये दिसत असतात. राज कपूर यांचा जन्मसुद्धा पेशावरमध्ये झाला होता. राज कपूर यांना हिंदी सिनेसृष्टीचे 'शोमॅन' म्हणून ओळखले जाते. त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 • शम्मी कपूर (21 ऑक्टोबर 1931 ते 14 ऑगस्ट 2011)

शम्मी कपूर पृथ्वीराज कपूर यांचा दुस-या क्रमांकाचा मुलगा आहे. त्यांनी तुमसा नहीं देखा, कश्मीर की कली, जानवर यांसह ब-याच गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांच्या चर्चित डान्सिंग स्टाईलमुळे त्यांना एल्विस प्रिस्ले ऑफ इंडिया म्हटले जाते. त्यांचे लग्न गीता बालीसोबत झाले होते. आदित्य राज कपूर आणि कंचन देसाई ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. 1950 ते 1970 पर्यंत आपल्या अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना भूरळ घालणा-या शम्मी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कारवर आपली मोहोर उमटवली होती. त्यांचे पूर्ण नाव शमशेर राज कपूर होते. शम्मी यांची दोन वेळा लग्न झाले होते. पहिले लग्न गीता बाली आणि दुसरे लग्न नीला देवीसोबत झाले होते. नीला देवी शम्मी कपूर यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. किडनी फेल झाल्यामुळे शम्मी कपूर यांचे 14 ऑगस्ट 2011 रोजी निधन झाले. रॉकस्टार हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात त्यांचा नातू रणबीर कपूर मेन लीडमध्ये होता.

 • शशी कपूर (18 मार्च 1938)

पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज पृथ्वीराज कपूर होते. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलून शशी कपूर ठेवले. शशी यांचे लग्न जेनिफर केंडलसोबत झाले होते. वयाच्या 51 व्या वर्षी कॅन्सरमुळे जेनिफर यांचे निधन झाले होते. शशी यांना कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत. अभिनेत्यासोबतच शशी निर्माते आणि दिग्दर्शकसुद्धा आहेत. सत्यम शिवम सुंदरम, दीवार आणि कभी कभी यांसारख्या गाजलेल्या सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या शशी कपूर यांना भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

 • रणधीर कपूर (15 फेब्रुवारी 1947)

रणधीर कपूर यांनीदेखील आपले आजोबा आणि वडिलांचा वारसा पुढे नेला आहे. 'जीत', 'कल आज और कल' आणि 'हीरालाल पन्नालाल' हे त्यांच्या करिअरमधील उल्लेखनीय सिनेमे आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या 'रमैय्या वस्तावैय्या' या सिनेमात ते झळकले होते. रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबिता यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली असून करिश्मा आणि करीना ही त्यांची नावे आहेत. रणधीर कपूर यांना असलेल्या दारुच्या व्यसनामुळे बबिता यांनी त्यांच्यापासून विभक्त होऊन दोन्ही मुलींचे संगोपन केले. काही वर्षांपूर्वी रणधीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. 'श्री 420' हा रणधीर कपूर यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ते बालकलाकाराच्या रुपात झळकले होते.

 • ऋषी कपूर (4 सप्टेंबर 1952 - 30 एप्रिल 2020)

आपल्या वडील आणि भावांप्रमाणे ऋषी कपूर यांनीही अभिनय क्षेत्रातच पदार्पण केले. मेरा नाम जोकर या सिनेमात ऋषी कपूर पहिल्यांदा बालकलाकाराच्या रुपात झळकले होते. बॉबी हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. त्यांचे लग्न अभिनेत्री नीतू सिंहसोबत झाले. ऋषी यांनी आपल्या करिअरमध्ये 'खेल खेल में', 'अमर अकबर एंथोनी', 'हीना' आणि 'बोल राधा बोल', 'चांदनी' यांसह ब-याच गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनय केला. 'शुद्ध देसी रोमांस', 'औरंगजेब', 'बेशर्म' आणि 'डी-डे' या सिनेमातदेखील ते झळकले होते. रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. याच वर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.

 • करिश्मा कपूर (25 जून 1974)

करिश्मा कपूर रणधीर कपूर आणि बबिता यांची थोरली कन्या आहे. करिश्मानेदेखील अभिनय क्षेत्राची निवड केली होती. प्रेम कैदी हा तिचा पहिला सिनेमा होता. 1991 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर तिने अनेक हिट बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये काम केले. 2003 मध्ये तिने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूरसह लग्न केले. मात्र लग्नाच्या काही दिवसांनी त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले. आता हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. करिश्मा आणि संजयला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. समायरा कपूर आणि किआन कपूर ही त्यांची नावे आहेत. 2012मध्ये रिलीज झालेल्या 'डेंजरस इश्क' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. मात्र तिचे हे कमबॅक फ्लॉप ठरले. यापूर्वी करिश्माने 'राजा हिन्दुस्तानी', 'दिल तो पागल है' आणि 'अंदाज अपना अपना' यांसह ब-याच गाजलेल्या सिनेमात अभिनय केला. गोविंदासोबतची तिची जोडी जास्त लोकप्रिय झाली होती.

 • करीना कपूर (21 सप्टेंबर 1980)

बॉलिवूडमध्ये बेबो नावाने करीना कपूर प्रसिद्ध असून ती येथील आघाडीची अभिनेत्री आहे. रणधीर आणि बबिता कपूर यांची ही धाकटी कन्या आहे. करीनाने जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र तिचा हा सिनेमा फ्लॉप ठरला. 'जब वुई मेट' या सिनेमाद्वारे तिला पहिल्यांदा कमर्शिअल सक्सेस मिळाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 2000 पासून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. याकाळात तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. मात्र सैफ अली खानसोबत लग्न करुन तिने सर्व चर्चांना विराम लावला. बॉलिवूडमध्ये झिरो साईज फिगरचा ट्रेंड सेट करणारी करीनाच आहे.

 • वरील दिसत असलेल्या पहिल्या छायाचित्रात आदित्य राज कपूर आणि त्यांची पत्नी प्रीती कपूर दिसत आहेत. आदित्य राज यांना अभिनयात रस नव्हता. मात्र त्यांनी 'बॉबी', 'धरम करम' आणि 'सत्यम शिवम सुंदरम' या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.
 • दुस-या छायाचित्रात कांचन देसाई दिसत आहेत. कांचन शम्मी कपूर यांची मुलगी आहे. केतन देसाईसोबत त्यांचे लग्न झाले आहे. यांनाही अभिनयात विशेष रस नाहीये.
 • तिस-या छायाचित्रात करिश्मासोबत शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर दिसत आहे. त्यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची मुलगी शीनासोबत झाले आहे. कुणाल यांनी सिनेमांऐवजी जाहिरांतीच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यांचे प्रॉडक्शन हाऊस असून अॅड फिल्म वॅलेस हे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे.
 • चौथ्या छायाचित्रात शशी कपूर यांचा दुसरा मुलगा करण कपूर दिसत आहे. करणने अभिनयाऐवजी मॉडेलिंग क्षेत्राची निवड करिअरच्या रुपात केली. ते लंडनमधील प्रसिद्ध फोटोग्राफर्सपैकी एक आहेत.
 • वरील छायाचित्रांपैकी पहिले छायाचित्र शशी कपूर यांची मुलगी संजना कपूरचे आहे. तिचे लग्न वाइल्ड लाइफचे संरक्षणकर्ते वाल्मिक थापरसोबत झाले आहे. संजना कपूरलासुद्धा अभिनयात सर नाहीये. मात्र 2012 पर्यंत ती पृथ्वीराज कपूर थिएटरची संचालिका होती.
 • दुसरे छायाचित्र ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची मुलगी रिद्धिमाचे आहे. रिद्धिमानेसुद्धा अभिनय क्षेत्राची निवड केली नाही. तिचे लग्न दिल्लीतील व्यावसायिक भरत साहनीसोबत झाले असून त्यांना एक मुलगी आहे. सामरा हे तिचे नाव आहे.
 • तिस-या छायाचित्रात रिद्धिमा आणि भरत साहनीची मुलगी समायरा दिसत आहे.
 • चौथे छायाचित्र रीमा जैनचे आहे. रीमा राज कपूर यांची मुलगी आहे. तिचे लग्न मोहन जैनसोबत झाले आहे. त्यांना आदर आणि अरमान ही दोन मुले आहेत.
 • वरील छायाचित्रांपैकी पहिल्या छायाचित्रात निखिल नंदा दिसत असून ते एमडी एस्कॉर्ट्सचे मालक आहेत. निखिल नंदा राज कपूर यांची मुलगी रितू कपूर नंदा यांचा मुलगा आहे. अर्थातच निखिल राज कपूर यांचे नातू आहेत. निखिलचे लग्न अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदासोबत झाले आहे. श्वेता आणि निखिलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अगस्त्या आणि नव्या ही त्यांची नावे आहेत.
 • दुस-या छायाचित्रात राज कपूर यांची मुलगी रीमा जैन यांची दोन मुले दिसत आहेत. आदर जैन आणि अरमान जैन ही त्यांची नावे आहेत.
 • तिसरे छायाचित्र राज कपूर यांचा धाकटा मुलगा राजीव कपूरचे आहे. राम तेरी गंगा मैली या सिनेमासाठी राजीव कपूरला ओळखले जाते. त्यांचे लग्न आर्किटेक्ट आरती सब्बरवालसोबत झाले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनीच त्यांचा घटस्फोट झाला होता.
 • चौथे छायाचित्र रितू नंदा यांचे आहे. रितू नंदा निखिल नंदाची आई आणि राज कपूर यांच्या कन्या होत्या. या एस्कोलाईफ लाईफ इंश्योरेन्स कंपनीच्या सीईओ होत्या. 17,000 पेंशन पॉलिसी विकल्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. राजन नंदा हे त्यांच्या पतीचे नाव असून निखिल नंदा आणि नताशा नंदा ही त्यांची मुले आहेत. यावर्षी 14 जानेवारी रोजी रितू नंदा यांचे निधन झाले.
बातम्या आणखी आहेत...