आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या छंदांमुळे नेहमीच चर्चेत असतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या कमाईचा मोठा भाग गॅजेट्समध्ये गुंतवतात. शाहरुख खान, अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक ए-लिस्टर्सचा या यादीत समावेश आहे.
चला जाणून घेऊया अशा सेलिब्रिटींबद्दल ज्यांना महागड्या गॅजेट्सची आवड आहे आणि ते खरेदी करायलादेखील त्यांना आवडते-
प्रियांका चोप्रा
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांका चोप्रा एक चांगली फोटोग्राफर देखील आहे. तिच्याकडे Nikon D90 आहे जे तिचे आवडते गॅजेट असल्याचे म्हटले जाते.
अमिताभ बच्चन
वयाच्या 78 व्या वर्षीही अमिताभ बच्चन तंत्रज्ञान आणि गॅजेट्सबद्दल अधिक जागरुक आहेत. त्यांना अनेक गॅझेट्सची आवड असून त्यांच्याकडे आयपॅड, मॅकबुक असे अनेक गॅझेट्स आहेत.
अभिषेक बच्चन
बिग बींप्रमाणेच अभिषेक बच्चनलाही गॅजेट्स आवडतात. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 47 लाख रुपयांच्या स्पोर्ट्स घड्याळाशिवाय अनेक महागडे गॅजेट्स आहेत. भारतात लाँच होण्यापूर्वीच त्याच्याकडे आयपॅड होता.
शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान खऱ्या आयुष्यातही किंग आहे. आयपीएल संघाच्या मालकीपासून ते दुबईतील व्हिलापर्यंत सर्व काही त्याच्याकडे आहे. तो एक गॅजेट फ्रीक देखील आहे आणि त्याला किंडलची आवड आहे. किंग खानला व्हिडिओ गेम्सची आवड असल्याने त्याच्याकडे महागडे गेमिंग स्टेशन असल्याचेही सांगितले जाते.
करीना कपूर खान
या यादीत बेबो म्हणजेच करीना कपूर खानच्या नावाचाही समावेश आहे. तिला एकदा तिच्या सर्वात महागड्या गॅजेटविषयी विचारणा झाली होती, त्यावेळी तिने तिच्या अत्याधुनिक लॅपटॉप असल्याचे सांगितले होते.
आर माधवन
स्वत: आर माधवनने खुलासा केला आहे की, तो गॅजेट्सचा शौकीन आहे. एका कार्यक्रमात त्याने सांगितले होते की, त्याच्याकडे चष्मा आहे जो श्रवणयंत्राप्रमाणे काम करतो. आणि एक कॅप आहे ज्यामध्ये एअर कंडिशनर आहे. त्याच्या घरी मॅकची जवळपास सर्व उत्पादने असल्याचेही सांगितले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.